Nagapur Vidhan Parishad Election result : विधान परिषद निवडणूक: भाजपचा दणदणीत विजय, महाविकासआघाडीची तब्बल 'एवढी' मते फुटली

nagapur vidhan parishad result :अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६  आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नगरसेवक छोटू भोयर यांना एक मत मिळाले. भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मते मिळाली  महाविकास आघाडीची जवळपास १६ मते फुटली असल्याचे समोर आले. 

nagapur vidhan parishad result, bjp win
भाजपचा दणदणीत विजय, महाविकासआघाडीची तब्बल 'एवढी' मते फुटली   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • महाविकास आघाडीची जवळपास १६  मते फुटली असल्याचे समोर आले
  • मतदानाच्या १२ तासांआधी नागपुरात काँग्रेसने छोटू भोयर यांचा पाठिंबा काढून घेतला
  • काँग्रेस नेत्यांनी चमत्कार होणार असल्याची भविष्यवाणी केली होती

Vidhan Parishad Election Result ।  नागपूर : भारतीय जनता पक्षा (Bharatiya Janata Party)चे नेते चंद्रशेखर बावनकुळे  (Chandrashekhar Bawankule) यांचा विधान परिषदे (legislative council) च्या नागपूर (nagapur) स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात दणदणीत विजय झाला आहे. दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसच्या मतपेढीला सुरुंग लावत अपेक्षित विजय मिळवला. बावनकुळे यांना भाजप आणि मित्रपक्षांची मते मिळालीच शिवाय त्यांनी काही महाविकास आघाडीची देखील काही मते मिळाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, भाजपने महाविकासआघाडीच्या मतांवर देखील सुरुंग लावला असचं म्हणावं लागेल.

महाविकास आघाडीची जवळपास १६  मते फुटली असल्याचे समोर आले

राज्याचे लक्ष नागपूरच्या निकालावर लागले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह भाजप-काँग्रेस नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत लागली होती. काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६  आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नगरसेवक छोटू भोयर यांना एक मत मिळाले. भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मते मिळाली  महाविकास आघाडीची जवळपास १६ मते फुटली असल्याचे समोर आले. 

मतदानाच्या १२ तासांआधी नागपुरात काँग्रेसने छोटू भोयर यांचा पाठिंबा काढून घेतला

दरम्यान, भाजपचे नगरसेवक छोटू भोयर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली. मात्र,  मतदानाच्या १२ तासांआधी नागपुरात काँग्रेसने छोटू भोयर यांचा पाठिंबा काढून घेतला आणि अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला. तर , भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर मोठ्या घडामोडी घडल्या. बावनकुळे यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर भाजपात धुसफूस सुरू झाली होती. 

काँग्रेस नेत्यांनी चमत्कार होणार असल्याची भविष्यवाणी केली होती

भाजपने या निवडणुकीत विजयाचा दावा केला होता. तर, दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी चमत्कार होणार असल्याची भविष्यवाणी केली होती. त्यामुळे ही निवडणूक कोण जिंकणार याची उत्सुकता लागली होती. मतांच्या आकडेवारीनुसार भाजप विजयी होण्याची शक्यता होतीच तर, फाटाफूट होऊ नये यासाठी भाजपने आपल्या नगरसेवकांना नागपूरमधून बाहेर नेले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी