Child Abused : नागपूर : नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विकृत तरुणाने सात लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मयूर मोडक हा नागपूरचा रहिवासी आहे. त्याने सीताबर्डी भागातील एका झोपडपट्टीतील सात लहान मुलांवर एका पडक्या घरात नेऊन अत्याचार केले. हा तरुण या लहान मुलांना खाऊचे आमिष दाखवायचा आणि त्यांना निर्जन ठिकाणी नेऊन अत्याचार करायचा. शुक्रवारी २७ मे रोजी एका लहान मुलाला त्याने खाऊचे आमिष दाखवून झोपडीत नेले आणि अत्याचार केले.
हा पीडित मुलगा जेव्हा घरी गेला तेव्ह तो जोरजोरात रडत होता. आई वडिलांनी त्याला विचारले असता त्याने झाली हकीगत सांगितली. तेव्हा पीडित मुलाच्या पालकांनी पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. आरोपी घटनास्थळाहून फरार झाला होता. पोलिसांनी या आरोपीचा कसून शोध घेतला आणि त्याला अटक केली.