Nagpur School : नागपुरातील एका शाळेत ३८ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह, ३ दिवस शाळा बंद

संततधार पावसामुळे महाराष्ट्रात पुर असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रातील नागपुरात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. नागपुरातील राय स्कूल अँड कॉलेज या खासगी शाळेतील ३८ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पुढील ३ दिवस शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

थोडं पण कामाचं
  • नागपुरात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे.
  • . नागपुरातील राय स्कूल अँड कॉलेज या खासगी शाळेतील ३८ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
  • त्यामुळे पुढील ३ दिवस शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

Nagpur Corona : नागपूर: संततधार पावसामुळे महाराष्ट्रात पुर असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रातील नागपुरात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. नागपुरातील राय स्कूल अँड कॉलेज या खासगी शाळेतील ३८ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पुढील ३ दिवस शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. (nagpur 38 shcool student corona positive )

यासोबतच नागपूर महानगरपालिकेकडून सर्व मुलांचे कोरोना तपासणी करण्यात येत आहे. नागपूरच्या राय शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याचे प्रथमदर्शनी आले होते. त्यानंतर पुढील तपासण्या केल्या असता इयत्ता आठवीच्या ३० हून अधिक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. या सर्व विद्यार्थ्यांना होम आयसोलेशनसाठी त्यांच्या घरी पाठवण्यात आले. आहे. कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतरच शाळेत प्रवेश दिला जाईल असे शाळा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अशाप्रकारे कोरोनाची प्रकरणे आल्यानंतर खबरदारी घेण्यासाठी शाळांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत अशी माहिती नागपूरच्या जिल्हा दंडाधिकारी आर विमला यांनी दिली आहे. वाढत्या कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यासाठी आज आणखी शाळांसाठी हीच मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहेत असेही आर विमला यांनी यावेळी नमूद केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी