ह्रदयद्रावक ! खेळता खेळता गेट अंगावर कोसळला अन् पाच वर्षीय चिमुकल्याने जीव गमावला, नागपुरातील घटना

Nagpur News: नागपुरातून एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. अंगावर गेट कोसळून एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • नागपुरातील ह्रदयद्रावक घटना
  • अंगावर गेट कोसळल्याने चिमुकल्याचा मृत्यू
  • खेळता-खेळता घडली दुर्दैवी घटना

Maharashtra 5 year old child died after gate fall on him: लहान मुले खेळत असताना कुटुंबातील वरिष्ठांचे त्यांच्याकडे लक्ष असणे अत्यंत महत्त्वाचे असते. अनेकदा अशा घटना घडल्याचं समोर आलं आहे की, खेळता-खेळता काही दुर्घटना घडतात आणि त्यात चिमुकल्यांना दुखापत होते. आता असाच प्रकार नागपुरातून समोर आला आहे. खेळताना अंगावर लोखंडी गेट कोसळून एका पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. (nagpur 5 year old child died after gate fall down on him read in marathi)

नागपुरातील निवृत्तीनगर येथे ही घटना घडली आहे. येथील 5 वर्षीय रियांश आपल्या घराच्या लोखंडी गेटवर झुलत होता आणि त्याच दरम्यान गेट कोसळला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेटचा एक नट निघाल्याने गेट कोसळला. या दुर्घटनेत पाच वर्षीय रियांश याच्या अंगावर गेट कोसळला.

हे पण वाचा : डोळ्यांच्या पापण्याच्या सौदर्यासाठी हे उपाय करून पाहा

या दुर्घटनेत रियांश हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी रियांशला मृत घोषित केलं. या घटनेमुळे संपूर्ण परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मित मृत्यूची नोंद करुन तपास सुरू केला आहे.

हे पण वाचा : या गोष्टी केल्यास तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाही

वाढदिवसाच्या दिवशी तरुणाचा मृत्यू

तर तिकडे बुलढाण्यात एका इंजिनिअर तरुणाचा वाढदिवसाच्या दिवशी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृतक तरुणाचे नाव गौरव जाधव असे होते आणि तो इंजिनिअर होता. गौरवचा वाढदिवस असल्याने मित्राने त्याला शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर त्याला भेटण्यासाठी बोलावले. या फोननंतर इंजिनिअर गौरव मित्राला भेटण्यासाठी घराबाहेर पडला मात्र, नंतर त्याचा मृतदेहच आढळला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी