Nagpur Crime: Gym Trainerच्या आवळल्या मुसक्या, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जिममध्ये द्यायचा ट्रेनिंग अन् रात्र होताच करायचा असं काही की...

Nagpur Crime News: नागपूर पोलिसांनी एका जिम ट्रेनरला बेड्या ठोकल्या आहेत. हा जिम ट्रेनर दिवसभर जिममध्ये ट्रेनिंग द्यायचा मात्र, रात्र होताच असं काही करायचा की त्यामुळे त्याला आता जेलची हवा खावी लागत आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • नागपूर पोलिसांनी जिम ट्रेनरच्या आवळल्या मुसक्या
  • एकूण तीन जणांसह एका सराफ व्यापाऱ्यालाही पोलिसांनी केली अटक 
  • आरोपींकडून एकूण 25 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त

नागपूर : एका जिम ट्रेनरला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. या जिम ट्रेनरसह त्याच्या साथीदारांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा जिम ट्रेनर दिवसभर जिममध्ये ट्रेनिंग द्यायचा आणि त्यानंतर रात्र होताच घरफोड्या, चोरी करायचा. अटक करण्यात आलेल्या जिम ट्रेनरचं नाव इमरान खान असे असून त्याच्यासह इतर चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

तरुणांमध्ये आजकाल लक्झरी लाईफ जगायचं फॅड आलं आहे. त्यासाठी ते कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. असाच एक प्रकार नागपुरात उघड झालेला आहे. नागपूर पोलिसांनी चोरट्यांच्या टोळीला अटक केली आहे. यातील एक आरोपी चक्क दिवसा जिम ट्रेनर म्हणून काम करतो आणि  रात्री घरफोडी करतो अशी माहिती समोर आली आहे. याच आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

हे पण वाचा : Optical illusion: खुर्चीवर बसण्यासाठी तुम्ही कोणत्या दिशेने जाल? उत्तर देण्यात 90 टक्के अयशस्वी

त्याच्या टोळीतील एकूण तीन जणांसह एका सराफा व्यापाऱ्यालादेखील पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हे तिघेही अनेक दिवसांपासून घरफोड्या करायचे. चोरीचा माल ते हंसापुरीतील सराफा व्यापाऱ्याला विकायचे.

हे पण वाचा : एकनाथ शिंदे गटात सहभागी न झालेली एकमेव नगरसेविका कोण?, ठाण्यातील 66 नगरसेवकांचा पाठिंबा

इमरान खान हमीद खान, अफसर खान अख्तर खान, सय्यद नौशाद अली सय्यद कलिमुद्दीन अली, विकास ऊर्फ रिंकू गौरीशंकर गुप्ता अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी इमरान खान हा जिम ट्रेनर असून आरोपी अफसर खान चिकन शॉप चालवतो तर नौशाद प्लास्टिकच्या वस्तू विकतो.

फिर्यादी उद्योजक मो. फैजान 20 जून रोजी कुटुंबीयांसह भोपाळला गेले होते. त्यावेळी त्यांच्या घराचे कुलूप तोडून 17 लाखांचे दागिने चोरून नेले. मानकापूर पोलिसांनी सीसीटीव्ही व इलेक्ट्रॉनिक सर्व्हायलन्सच्या मदतीने तपास सुरू केला. त्यात आरोपींचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता. संपूर्ण प्रकार समोर आला आहे. 

आरोपींनी चोरीचा माल हंसापुरी येथील सराफा विकास ऊर्फ रिंकू गुप्ता याला विकला होता. पोलिसांनी गुप्ता यालाही अटक केली. तसेच तीन दुचाकी व दागिने असा सुमारे 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी