Nagpur Rain : नागपुरात गेल्या ४८ तासांपासून मुसळधार पाऊस, तलावाचे ओव्हरफ्लो दरवाजे उघडले

नागपूर शहरात गेल्या ४८ तासांपासून संततधार पाऊस पडत आहे.  त्यामुळे शहरातील तलाव नाले आणि नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नागपूरचा अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाचे तीन दरवाजे उघडले  आहेत. त्यामुळे नागपूरच्या पिवळी नदीला पूर आला आहे.

थोडं पण कामाचं
  • नागपूर शहरात गेल्या ४८ तासांपासून संततधार पाऊस पडत आहे.  
  • त्यामुळे शहरातील तलाव नाले आणि नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
  • नागपूरचा अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाचे तीन दरवाजे उघडले  आहेत.

Nagpur Heavy Rain : नागपूर : नागपूर शहरात गेल्या ४८ तासांपासून संततधार पाऊस पडत आहे.  त्यामुळे शहरातील तलाव नाले आणि नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नागपूरचा अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाचे तीन दरवाजे उघडले  आहेत. त्यामुळे नागपूरच्या पिवळी नदीला पूर आला आहे. या पुरामुळे नागपुरातील सखल भागात पूर आला आहे, त्याच नदीवर बांधलेल्या पुलावरून पाणी जात आहे. पुलावरून पाणी वाहत जात असल्याने पोलिसांनी खबरदारी म्हणून या पुलावरील वाहतूक बंद केली अहे.

सततच्या पावसामुळे सर्व नदी, नाले, पूलावरून पाणी वाहून जात आहे. या पावसामुळे नागपुरात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. कालच नागपुरात पुलावरून जाताना स्कॉर्पिओ गाडी वाहून गेली. या मुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतही मुसळधार पाऊस, अंधेरी सबवेत साचले पाणी

 

दादर पूर्व भागातची साचले पाणी

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी