Nagpur : नागपूर पालिकेचा 'हिट अ‍ॅक्शन प्लॅन'; 15 मार्चपासून शाळा सकाळी भरवणार

नागपूर
भरत जाधव
Updated Mar 04, 2023 | 11:44 IST

जागतिक हवामान विज्ञान संघटनेने (World Climate Science organization) जागतिक तापमानात (global temperature) वाढ होण्याचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागानेही (Indian Meteorological Department) यंदा राज्यातील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज  वर्तवला आहे. (Nagpur Municipality's 'Hit Action Plan'; School will be held in the morning from March 15)

Nagpur Municipality's 'Hit Action Plan
नागपूर पालिकेचा 'हिट अ‍ॅक्शन प्लॅन'; 15 मार्चपासून शाळा सकाळी भरवणार   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हवामानशास्त्र विभागानुसार यंदाचे वर्ष एल निनो प्रभावित राहणार आहे.
  • नागपूर महानगर पालिकेने 15 मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेतला आहे.
  • काही भागात नागरिकांचा उन्हापासून बचाव व्हावा यासाठी शेड नेट तयार करणार

Heat Wave Action Plan : जागतिक हवामान विज्ञान संघटनेने (World Climate Science organization) जागतिक तापमानात (global temperature) वाढ होण्याचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागानेही (Indian Meteorological Department) यंदा राज्यातील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज  वर्तवला आहे. (Nagpur Municipality's 'Hit Action Plan'; School will be held in the morning from March 15)

हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार, राज्यात हळूहळू उन्हाचा चटका वाढू लागला आहे. या वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिकेने (Nagpur Municipal Corporation)आपला हिट अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे.उन्हाचा प्रकोप लक्षात घेता नागपूर महानगर पालिकेने 15 मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त (Municipal Commissioner) बी राधाकृष्णन ( B Radhakrishnan) यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
 अधिक वाचा  : संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी दोन जण पोलिसांच्या ताब्यात

पालिकेचा हिट अ‍ॅक्शन प्लॅन 

हवामानशास्त्र विभागानुसार यंदाचे वर्ष एल निनो प्रभावित राहणार आहे. त्यामुळे येणारा उन्हाळा अधिकच तापणार असल्याचे संकेत दिसत आहेत.  ला निनानंतर पुढे उष्णता वाढवणारा अल निनो विकसित होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिका कामाला लागली असून हिट अॅक्शन प्लॅन तयार केला आहे.  

अधिक वाचा  : Bold Web Series : एकट्याने बघा या वेब सीरिज नाहीतर...

त्यानुसार पालिकेचे सर्व रुग्णालय सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सर्व्हे करुन उष्णतेची झळ पोहोचणाऱ्या वस्त्यांना आणि तेथील नागरिकांचा शोध घेऊन त्यानुसार नागपूर महानगर पालिकेकडून ORH चा पुरवठा केला जाणार आहे. सोबतच शहरातील उद्याने दुपारी पण उघडी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नागरिकांनो काळजी घ्या 

महापालिका गरजेनुसार काही भागात नागरिकांचा उन्हापासून बचाव व्हावा यासाठी शेड नेट तयार करणार आहे. यावर्षीचा कडक उन्हाळा बघता पहिल्यांदाच हिट ऍक्शन प्लॅन तयार करताना पालिकेने व्हीजीएनआयटी आणि हवामान विभागाची मदत घेतली आहे. तीव्र उन्हाळ्यात डीहायड्रेशन होण्याची शक्यता असते. त्या पार्श्वभूमीवर पालिकेने खबरदारी घेतली आहे. उन्हाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केल्याची माहिती आयुक्त पालिका आयुक्त बी राधाकृष्णन यांनी दिली.

अधिक वाचा  : या ठिकाणी लग्नाआधीच होत असतो हनिमून, काय आहे हा प्रकार

 मार्च ते मे महिन्या दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून जाहीर केली आहे. या काळात गुजरात ते पश्चिम बंगाल पट्ट्यात उष्णतेच्या लाटा थडकतील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

 यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात पारा चाळीशी जवळ पोहोचला होता. फेब्रुवारी महिना हा गेल्या 147 वर्षातला सर्वात उष्ण महिना ठरला. पुढील तीन महिने देखील असेच तापदायक राहतील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी