Know about Mosque : नागपुरात मुस्लिम बांधवांकडून मशीद परिचय कार्यक्रमाचे आयोजन, मशीदींबद्दल गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न

ज्ञानवापी मशीदीवरून देशातील धार्मिक वातावरण ढवळून निघाले आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशीदींवरील भोंग्यावर आक्षेप नोंदवला होता. यावरून नागपुरात मुस्लिम बांधवांनी मशीद परिचयाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातून इतर धर्मियांना मुस्लिम धर्म आणि मशीदीबद्दल माहिती देण्यात आली.

थोडं पण कामाचं
  • ज्ञानवापी मशीदीवरून देशातील धार्मिक वातावरण ढवळून निघाले आहे.
  • तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशीदींवरील भोंग्यावर आक्षेप नोंदवला होता.
  • नागपुरात मुस्लिम बांधवांनी मशीद परिचयाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

know about mosque : नागपूर : ज्ञानवापी मशीदीवरून देशातील धार्मिक वातावरण ढवळून निघाले आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशीदींवरील भोंग्यावर आक्षेप नोंदवला होता. यावरून नागपुरात मुस्लिम बांधवांनी मशीद परिचयाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातून इतर धर्मियांना मुस्लिम धर्म आणि मशीदीबद्दल माहिती देण्यात आली. तसेच मशीदींबद्दल गैरसमजही दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

नागपूर शहरात हिंद आणि जाफर नगर मशीद कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जाफर नगर मशिदीत ‘मशीद परिचय’ चे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमात नमाजशी संबंधित अजान, वजू, नमाज, दुआ सांगितली. तसेच मस्जिद दर्शनांतर्गत मशिदीच्या विविध ठिकाणांना भेटी दिल्या. या कार्यक्रमात सर्व धर्माच्या लोकांना आमंत्रित करण्यात आले होते.  मशिदीमध्ये लोकांना भडकवले जाते किंवा धर्मांध बनवले जाते असे गैरसमज या कार्यक्रमातून दूर करण्यात आले. या कार्यक्रमाला इतर धर्मियांच्या बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी