Nagpur Accident CCTV: भरधाव बोलेरोची पादचाऱ्यांना जोरदार धडक; अंगावर काटा आणणाऱ्या अपघाताचा LIVE VIDEO 

Speeding Bolero hits people in Nagpur: नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरधाव बोलेरो कारने दोघांना जोरदार धडक दिली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

nagpur speeding bolero jeep hits people on road shocking incident caught in cctv nagpur crime news
भरधाव बोलेरोची पादचाऱ्यांना जोरदार धडक; Shocking VIDEO आला समोर  
थोडं पण कामाचं
  • नागपुरातील अपघाताचा LIVE VIDEO आला समोर 
  • भरधाव बोलेरोने पादचाऱ्यांना दिली जोरदार धडक 
  • सुदैवाने अपघातात जीवितहानी झालेली नाहीये

Nagpur Accident caught in CCTV: एका भरधाव बोलेरो गाडीने रस्त्यावरुन जाणाऱ्या दोघांना जोरदार धडक (bolero hits people) दिली आहे. नागपुरातील पंचशील चौकात हा भीषण अपघात (major accident) झाला आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला आहे त्याच परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा अपघात कैद झाला आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. (nagpur speeding bolero jeep hits people on road shocking incident caught in cctv nagpur crime news)

नागपूरच्या पंचशील चौकात लोकांची नेहमी प्रमाणे वर्दळ सुरू होती. त्याच दरम्यान एक भरधाव जाणारी बोलेरो कार अनियंत्रित झाली आणि भीषण अपघात घडला. बोलेरो गाडीने रस्त्यावरुन जात असलेल्या लोकांना धडकून पुढे गेली, ही कार इथेच थांबली नाही तर पार्किंगमध्ये उभी असलेली कार आणि दुचाकीचाही धडक दिली.

Nagpur accident CCTV live video 

त्यानंतर ही बोलेरो गाडी थेट फुटपाथवर गेल्याचं दिसत आहे. या घटनेत एक रस्त्यावरून चालणारा एक पुरुष आणि एक महिला गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही संपूर्ण घटना जवळच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

अधिक वाचा : "महाराष्ट्रातील दोन्ही काँग्रेस फुटीच्या मार्गावर"; पुन्हा राजकीय भूकंप होणार?

ही घटना २२ जुलै २०२२ रोजी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास घडली आहे. सीसीटीव्हीत दिसत आहे की, रस्त्याच्या किनाऱ्यावर काही गाड्या पार्क करण्यात आल्या आहेत. तर त्या गाड्यांच्या शेजारून नागरिक चालत जात आहेत. अशाच प्रकारे एक महिला आणि एक पुरुष हे सुद्धा रस्त्यावरुन जात होते तितक्यात एक भरधाव बोलेरो येते आणि त्यांना जोरदार धडक देते. या दोघांचेही नशीब बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचला आहे. मात्र, या अपघातात ते जखमी झाले आहेत.

गाडी चालकाने काढला पळ

या घटनेत 1 कार, 2 दुचाकी आणि 1 सायकलचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र कार चालकाने घटनेनंतर तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी नागपूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी