Crime News marathi: नागपुरात शुल्लक कारणावरुन मित्राचीच हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू प्यायल्यानंतर मित्राला एकटे सोडून इतर मित्र घरी गेले आणि याच कारणावरुन वाद इतका वाढला की, मित्राने मित्राची हत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. (nagpur youth killed over minor dispute maharashtra crime news marathi)
श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच्या अमावस्येच्या आदल्या दिवशी गटारी साजरी करण्याची प्रथा आहे. गटारीच्या दिवशी मांस-मच्छी खाण्यात येते. तर काही जण मोठ्या प्रमाणात मद्यपानही करतात. मात्र, याच गटारीच्या पार्टीत असं काही घडली की एका मित्राचा मित्रानेच जीव घेतला आहे. नागपुरातील मा अंबे नगरात ही धक्कादायक घटना घडली आहे.
दारू प्यायला सोबत गेल्यानंतर मित्राला एकट सोडून घरी परतुन मित्राला महाग पडलं आहे. एकटे सोडून का गेले? या शुल्लक कारणावरून एकाची हत्या केल्याची घटना पारडी पोलीस स्टेशनमध्ये समोर आली आहे.
अधिक वाचा : Pune murder caught in CCTV: भररस्त्यात तरुणावर ३५ वार, पुण्यातील हत्याकांड सीसीटीव्हीत कैद
काल गटारीच्या निमित्याने मा अंबे नगरातील तिघे परिचित मित्र दारू पिण्यासाठी गेले होते. त्यातील मृतक नेमलाल गडे आणि मुकुंद मते भाजी बनविण्यासाठी घरी परतले. मात्र आरोपी विनोद निर्मलकर तिकडेच थांबला. दोघे मित्र सोडून गेल्याच्या संतापातून आरोपीने मुकुंद मते याला फोन करून बघून घेण्याची धमकी देत घरी येतो म्हणून सांगितलं. त्यानंतर आपल्या अल्पवयीन भावासोबत तो मते याच्या घरी पोहोचला.
अधिक वाचा : महिलांनो सावधान! Instagram वर DP, Photo आणि Reel मुळे होऊ शकते सेक्सटॉर्शन
आरोपी आणि मते यांच्यामध्ये वादावादी सुरू असताना मृतक नेमलाल गडे तिथे पोहोचला. आरोपींनी त्याला धक्का दिल्याने त्यांचं डोकं भिंतीला आपटलं. त्यामुळे रक्तस्त्राव सुरू झाला आरोपी विनोद आणि त्याच्या अल्पवयीन भावाने मृतकाच्या छातीवर देखील मारले. त्यामुळे नेमलाल याचा जागीच मृत्यू झाला.
शुल्लक कारणावरून निरापराध्याची हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी पोहोचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्यावर विविध कलमंतर्गत गुन्हे दाखल केले आहे. पारडी पोलीस पुढील तपास करत आहे.