Nana Patole| बुलडाणा : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Congress state president) नाना पटोले (Nana Patole) हे त्यांच्या स्पष्ट बोलतात त्यामुळे ते कुठल्यानं कुठल्या वक्तव्यामुळे ते सतत चर्चेत असतात. दरम्यान, त्यांनी आता महाविकासआघाडीच्या (Mahavikasaghadi) विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पटोले यांनी 'मला ३ वर्षांच्यावर प्रदेशाध्यक्षपदावर राहायचं नाही' असं वक्तव्य केलं असून, त्यांच्या या वक्तव्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचबरोबर अनेक राजकीय विश्लेषक यांच्या या विधानावर अनेक तर्कवितर्क लावत आहेत.
पटोले यांना पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले या प्रशावर बोलताना पटोले यांनी अनेक खुलासे केले आहेत. २०२४ पर्यंत काँगेस हा मोठा पक्ष होणार आहे, त्या परीने माझे काम सुरू आहे. आम्ही सर्व मिळून काम करत आहोत आणि कुणाच्या भावना असतात, त्यांच्या भावनांना विरोध करण्याची गरज नाही' असं नाना पटोले म्हणाले. पुढे त्यांना पत्रकारांनी 'काँग्रेसमध्ये तुमच्याविरोधात तक्रारी केल्या जात आहे, काँग्रेस हायकमांडकडेही तुमच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे का? असा असता यावर नाना पटोले म्हणाले की, 'कुणीही १० ते १२ वर्ष कोणतेही पद भोगण्यासाठी येत नाही. मलाही 3 वर्षाच्यावर प्रदेशाध्यक्ष पदावर राहायचं नाही. नाना पटोले बुलडाणा (Buldhana) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. आज खामगावमध्ये पत्रकारांशी बोलत असताना नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या वादावर आपली भूमिका मांडली आहे.
खरंतर विरोधकांनी गेल्या पाच वर्षात जे पाप केलं ते काढायची संधी सत्ता पक्षाच्या आमदारांना मिळाली पाहिजे. ही भूमिका आमची आहे. पण सरकारच आता विरोधकांना त्यांचं पाप लपविण्यासाठी मदत करत आहे, अशीही भूमिका घेतली जाऊ शकते. असं म्हणत पटोले यांनीच सरकारला घराचा आहेर दिला आहे. पुढे बोलतना पटोले म्हणाले की, त्यांनी जे काही पाप केलं ते खूप आहे. त्याबाबतचे अनेक मुद्दे आहेत. ते मुद्दे आपल्याला पुढे आणता येतील. म्हणून आम्ही सरकारला सांगतोय की, पुढचं बजेट अधिवेशन आहे. ते पूर्ण काळ चालावं. विधानसभेचं कामकाज करताना या सर्व भूमिका आम्ही मांडणार, असं नाना पटोले म्हणाले. अधिवेशन कमी होणं हे लोकशाहीसाठी घातक आहे. मी विधानसभा अध्यक्ष असतानाही माझी भूमिका स्पष्ट केलेली होती. माझी आजही तीच भूमिका आहे. पण विरोधक या पद्धतीचा आरोप करत असतील तर हा थोतांड आहे. असंही पटोले म्हणाले.
महाराष्ट्रात विधानसभेचे अधिवेशन सुरू असून त्यामुळे राजकारण तापले आहे. विधानसभा अध्यक्षाच्यापासून ते इतर अनेक मुद्द्यांपर्यत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांची एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यातच आता नाना पटोलेंकडे लक्ष केंद्रीत झाले आहे.