nana patole परमबीर सिंग यांच्या लास्ट लोकेशनबाबत नाना पटोलेंनी केला गौप्यस्फोट

nana patole revealed last location of param bir singh : परमबीर सिंग यांना भाजपने गायब केलं असून, त्यांचं शेवटचं लोकेशन हे गुजरातमधील अहमदाबादमध्ये होतं असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी केला

nana patole revealed last location of param bir singh
परमबीर सिंग यांच्या लास्ट लोकेशनबाबत नाना पटोलेंनी केला गौप्यस्फोट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • परमबीर सिंग यांना बेपत्ता करण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले आहे
  • आर्यन खान अटक प्रकरणावरून भाजपने हिंदू-मुस्लिम वाद पेटवला – नाना पटोले
  • काँग्रेसवर आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी खोटे आरोप केले

nana patole revealed last location of param bir singh बुलडाणा : राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त यांनी गंभीर आरोप केले होते. दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर ईडीने देखील माजी अनिल देशमुख यांच्यावर कारवाई केली आहे. १०० कोटी वसुली प्रकरणी देशमुख (anil deshmukh) सध्या ईडीच्या (ed) कोठडीत आहे. तर , आरोप करणारे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग मात्र अनेक दिवसांपासून गायब आहेत. मात्र, परमबीर सिंग यांना भाजपने गायब केलं असून, त्यांचं शेवटचं लोकेशन हे गुजरातमधील अहमदाबादमध्ये होतं असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी केला आहे. नाना पटोले यांनी केलेल्या आरोपानंतर मोठी खळबळ उडाली आहे. नाना पटोले हे बुलडाण्यामध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे. नाना पटोले यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. तसंच १०० कोटी वसुली प्रकरणावरून पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

परमबीर सिंग यांना बेपत्ता करण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले आहे

अनिल देशमुख यांच्यावर ज्याने आरोप केले तोच गायब असेल तर वास्तव लोकांसमोर आणण्याचे गरजेचं आहे, अनिल देशमुख यांच्याबद्दल सूड भावनेनं कारवाई करण्यात आली आहे, अशी टीकाही पटोले यांनी केली. परमबीर सिंग यांचं जे शेवटचं लोकेशन हे ईडीने सांगितलं आहे की ते अहमदाबादमध्ये होतं. त्यानंतर ते कुठे होते हे कुणालाच दिसले नाही. याचाच अर्थ गुजरातमधून परमबीर सिंग गायब झाले. त्यांना बेपत्ता करण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले आहे, असा आरोपच पटोले यांनी केला.

आर्यन खान अटक प्रकरणावरून भाजपने हिंदू-मुस्लिम वाद पेटवला – नाना पटोले

दरम्यान, पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, आर्यन खान अटक प्रकरणावरून भाजपने हिंदू-मुस्लिम वाद पेटवला आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम भाजपने केले आहे, अशी टीकाही पटोले यांनी केली. बिहार निवडणुकीच्या तोंडावर सुशांत सिंह राजपूत प्रकरण उकरून काढले. राजपूत समाजाचे मतं मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला दूर करण्यासाठी पहिल्यापासून प्रयत्न सुरू असल्याचं देखील पटोले यांनी म्हटलं आहे. 

काँग्रेसवर आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी खोटे आरोप केले

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी काँग्रेसवर खोटे आरोप केले आहे. आम्ही किरीट सोमय्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून कारवाईला तयार राहावे, असं आव्हान देखील पटोले यांनी भाजप आणि किरीट सोमय्या यांना दिले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी