नवनीत राणांचे पती आमदार रवी राणा आणि शिवसेनेच्या नेत्यामध्ये तुफान हाणामारी 

नागपूर
Updated Oct 27, 2019 | 18:11 IST

अमरावतीमधील बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांच्यात तुफान हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे. 

navneet rana's husband mla ravi rana and shiv sena leader fighting in amravati 
नवनीत राणांचे पती आणि शिवसेनेच्या नेत्यामध्ये हाणामारी  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • शिवसेना नेता आणि नवनिर्वाचित आमदारात हाणामारी 
  • नवनीत कौर राणा यांचे पती रवी राणा शिवसेना नेत्यामध्ये तुफान मारामारी 
  • नवनीत राणांविरोध शिवसेना नेत्याने अपशब्द वापरल्याचा रवी राणांचा आरोप

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील खासदार नवनीत कौर राणा आणि बडनेराचा नवनिर्वाचित आमदार रवी राणा आणि अमरावतीतील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश बुब यांच्यात चक्क हाणामारी झाली. हाणामारीचा हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे. अशाप्रकारे दोन बड्या नेत्यांमध्येच माराहाण झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात आता त्याविषयीच चर्चा सुरु आहेत. सुरुवातीला दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. पण त्यानंतर अचानक दोघांमध्ये मारहाण सुरु झाली. दरम्यन या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बडनेरा येथील एका वृद्धाश्रमात या दोन्ही नेत्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. खरं तर हे दोन्ही नेते एकाच वृद्धाश्रमात गेले होते. दोन्ही नेते हे वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी समोरासमोर आले. याचवेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. ज्यातून मारहाणीसारख लाजिरवाणा प्रकार घडला. दरम्यान, रवी राणा यांनी या प्रकारानंतर असा आरोप केला आहे की, दिनेश बुब यांनी आपली पत्नी आणि खासदार नवनीत राणा यांच्याविरुद्ध अपशब्द वापरले. त्यानंतर हा वाद निर्माण झाला. दरम्यान, दिनेश बुब यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहे. 

'आमदार रवी राणा हे स्वत: माझ्यावर चालून आले. त्यामुळे स्व-संरक्षणार्थ त्यांच्यावर हात उचलावा लागला. पण कधीही कुठल्याही महिलेबाबत अपशब्द वापरलेले नाहीत. आज जे काही झालं त्यात दोघांचाही दोष आहे.' असा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश बुब यांनी केला आहे. 

शिवसेना जिल्हाप्रमुख दिनेश बुब यांचं स्पष्टीकरण:

रवी राणा आणि दिनेश बुब हे वृद्धाश्रमात फराळ आणि कपडे वाटपासाठी आले होते. दोन्ही नेत्यांनी सारखाच कार्यक्रम आयोजित केला होता. पण याच कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली. दरम्यान आता या प्रकाराबाबत दोन्ही नेते आता नेमकं काय पाऊल उचलणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. या दोन्ही नेत्यांनी टोकाचं पाऊल उचलल्यामुळे बडनेरामध्ये देखील उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...