Praful Patel : निश्चित झालेल्या कोट्याप्रमाणेच मतदान, राज्यसभा निवडणुकीत विजयानंतर प्रफुल पटेल यांचे विधान

महाविकास आघाडीतील तिनही पक्षांची मते फुटलेली नाहीत, आमच्या अधिकृत उमेदवारांना निश्चित कोट्याप्रमाणेच मतं मिळाली असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा निवडणुकीत विजयी झालेले प्रफुल पटेल यांनी केले आहे. तसेच भाजपचा एक अतिरिक्त उमेदवार विजयी झाला म्हणून हा फार मोठा विजय नाही तसेच राज्यसभेच्या निवडणुकीत जर कोणी गडबड केली असेल तर कारवाई होऊ शकते असेही पटेल म्हणाले. 

थोडं पण कामाचं
  • महाविकास आघाडीतील तिनही पक्षांची मते फुटलेली नाहीत, आमच्या अधिकृत उमेदवारांना निश्चित कोट्याप्रमाणेच मतं मिळाली
  • भाजपचा एक अतिरिक्त उमेदवार विजयी झाला म्हणून हा फार मोठा विजय नाही
  • राज्यसभेच्या निवडणुकीत जर कोणी गडबड केली असेल तर कारवाई होऊ शकते असेही पटेल म्हणाले. 

Praful Patel : नागपूर : महाविकास आघाडीतील तिनही पक्षांची मते फुटलेली नाहीत, आमच्या अधिकृत उमेदवारांना निश्चित कोट्याप्रमाणेच मतं मिळाली असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा निवडणुकीत विजयी झालेले प्रफुल पटेल यांनी केले आहे. तसेच भाजपचा एक अतिरिक्त उमेदवार विजयी झाला म्हणून हा फार मोठा विजय नाही तसेच राज्यसभेच्या निवडणुकीत जर कोणी गडबड केली असेल तर कारवाई होऊ शकते असेही पटेल म्हणाले. 

नागपूर विमानतळावर प्रफुल पटेल यांचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. तेव्हा माध्यमांशी बोलताना पटेल म्हणाले की, मला स्वतःला 51 मतं घेता आले असते.. मात्र आम्ही 42 चा कोटा ठरवला आणि मला 42 मत मिळाल्यानंतर उरलेली राष्ट्रवादीच्या वरिष्ठ मंत्र्यांची 9 मतं शिवसेनेचे उमेदवार  संजय पवार यांना दिले. मला स्वतःला ४३ मते मिळाली. मलाच माहीत नाही की मला अतिरिक्त मत कोणाचा मिळाला. माझ्यावर प्रेम करणारा व्यक्ती कोण आहे हे मला माहीत नाही. असे माझ्यावर प्रेम करणारे अनेक आहेत. मी जर त्यांना संपर्क साधला असता तर 4 - 5 मत फक्त प्रेमापोटीच मिळाले असते असे पटील म्हणाले. 

पटेल म्हणाले की, महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाची मतं फुटली नाहीत. आमच्या अधिकृत उमेदवारांना दिलेल्या निश्चित कोट्या प्रमाणेच मतं मिळाली. सरकार मध्ये असलेले आणि पाठिंबा देणारे लहान पक्ष हे महाविकास आघाडी सोबत राहिले. काही अपक्ष मतं भाजपला गेली आहे. एक मत अपात्र ठरले, तर आमचे दोन नेते तुरुंगात होते. या सर्व गोष्टींचा परिणाम निकालावर झाला आहे. असे असले तरी महाविकास आघाडीला हा मोठा फटका नाही अशी पटेल म्हणाले. 


हा संशोधनाचा विषय

काँग्रेसने ४४ मते का घेतली हा संशोधनाचा विषय आहे. मला माहित नाही की त्यांनी पक्षांतर्गत कितीचा कोटा ठरवला होता... मात्र महाविकासआघाडी मध्ये वरिष्ठ नेत्यांनी एकत्रितपणे 42 चा कोटा ठरवला होता, अशी माहिती पटेल यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मी अधिकृतपणे सांगू शकतो की आम्ही आमची 51 मतं व्यवस्थित वापरली गेली.  एकही मताचे नुकसान झालेले नाही,  मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बोलू शकतो काँग्रेस बद्दल नाही. या एक दोन दिवसात याबद्द आम्ही माहिती घेऊ आणि सर्व चित्र स्पष्ट होईल असेही पटेल म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी