पाटलांच्या पोरांना लग्नापूर्वीच मुलं होतात, भाजपवर टीका करताना राष्ट्रवादीच्या नेत्याची जीभ घसरली

Rajan Patil criticized Dhananjay Mahadik at low level ; राजन पाटील यांचं वक्तव्य अतिशय संतापजनक आणि निषेधार्ह आहे. ज्या पद्धतीने त्यांनी दर्पोक्ती केली आहे, ही भूमिता त्यांची आहे? त्यांच्या पक्षाची आहे, ही भूमिका नक्की कोणाची आहे हे मांडणं अतिशय गरजेचं असल्याचं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. आठ दिवसांपूर्वी महिला सन्मानाची भूमिका असणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाची त्याच पक्षाच्या नेत्याने आता जी काही माती केली आहे त्याबद्दल त्यांनी सांगावं असं देखील वाघ म्हणाल्या.

Rajan Patil criticized Dhananjay Mahadik at low level
राजन पाटलांची टीका करताना घसरली जीभ, चित्रा वाघ म्हणाल्या...  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • धनंजय महाडिक यांच्यावर टीका करताना राजन पाटील यांची जीभ घसरली
  • पाटलांच्या पोरांना लग्नाच्या आधीच तुझ्याएवढी एवढी बाळं असतात - चित्रा वाघ
  • राष्ट्रवादीच्या नेत्याने महाराष्ट्रातील सर्व महिलांची खिल्ली उडवण्याचं काम केलं – चित्रा वाघ

Rajan Patil ​ : वर्धा : भीमा कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या प्रचारसभेत धनंजय महाडिक यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार राजन पाटील यांची जीभ घसरली होती. आम्ही पाटील आहोत, पाटलांच्या पोरांना लग्नाच्या आधीच तुझ्याएवढी एवढी बाळं असतात असं राजन पाटील यांनी म्हटलं होत. राजन पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी चांगलाचं समाचार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने महिलांच्या बाबतीत केलेल्या घाणेरड्या वक्तव्यामुळे पोलिसांनी राजन पाटील यांच्यावर तात्काळ 354 चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. (Ncp leader Rajan Patil criticized bjp leader Dhananjay Mahadik controversial statement)

अधिक वाचा ; अरे देवा! आता Amazonमधील 3766 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात

राष्ट्रवादीच्या नेत्याने महाराष्ट्रातील सर्व महिलांची खिल्ली उडवण्याचं काम केलं – चित्रा वाघ

दरम्यान, पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, राजन पाटील यांचं वक्तव्य अतिशय संतापजनक आणि निषेधार्ह आहे. ज्या पद्धतीने त्यांनी दर्पोक्ती केली आहे, ही भूमिता त्यांची आहे? त्यांच्या पक्षाची आहे, ही भूमिका नक्की कोणाची आहे हे मांडणं अतिशय गरजेचं असल्याचं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. आठ दिवसांपूर्वी महिला सन्मानाची भूमिका असणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाची त्याच पक्षाच्या नेत्याने आता जी काही माती केली आहे त्याबद्दल त्यांनी सांगावं असं देखील वाघ म्हणाल्या.  दरम्यान, महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी करण्यात आल्या आणि राष्ट्रवादीच्या या नेत्याने तर महाराष्ट्रातील सर्व महिलांची खिल्ली उडवण्याचं काम केलं आहे. त्याचा निषेध करावा तितका कमी आहे, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

अधिक वाचा ; थंडीत वजन कमी करण्यासाठी वापरा मेथीचे दाणे आणि पहा फरक 

नेमकं काय म्हणाले होते राजन पाटील?

धनंजय महाडिक यांच्यावर टीका करताना राजन पाटील यांची जीभ घसरली होती. भीमा कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या प्रचारसभेत बोलताना धनंजय महाडिक यांच्यावर खालच्या पातळीत टीका केली होती.'आमच्या पोरांना बाळ म्हणतोय, अरे आम्ही पाटील आहोत, पाटलांच्या पोरांना लग्नाच्या आधीच तुझ्याएवढी एवढी बाळं असतात असे सांगत त्याचा आम्हाला स्वाभिमान असल्याचं राजन पाटील यांनी म्हटलं होत. तसेच आमच्या पोरांना वयाच्या 17 व्या वर्षीच 302, 307 ची कलमं लागली आहेत, याचा आम्हाला अभिमान असल्याचे म्हणत राजन पाटील यांनी एकप्रकारे मुलांच्या गुन्हेगारीचं समर्थन केलं असल्याचे दिसून आले होते.

अधिक वाचा ; अखेर 2000 रुपयांच्या नोटा का गायब झाल्या आहेत? पाहा कारण

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी