विधवा महिलांसोबत सुप्रिया सुळेंनी साजरी केली वटपौर्णिमा, 'हा' घेतला उखाणा

ncp mp supriya sule celebrates vat purnima with widows : सुप्रिया सुळे यांनी वडाची पूजा करून वटपौर्णिमा साजरी केली. यावेळी ‘ग्लासात ग्लास छत्तीस ग्लास सदानंदराव फस्ट क्लास,’ असा उखाणा सुप्रिया सुळे यांनी घेतला. यावेळी उपस्थित महिलांनी टाळ्यांचा गजर केला. दरम्यानं, विधवा महिलांना कुठल्याही सण-समारंभात स्थान दिले जात नाही. याच परंपरेला फाटा देत सुप्रिया सुळे यांनी आज अमरावतीत विधवा महिलांसोबत वटपौर्णिमेचे पूजन करून एक नवा पायंडा पाडला

ncp mp supriya sule celebrates vat purnima with widows
विधवा महिलांसोबत सुप्रिया सुळेंनी साजरी केली वटपौर्णिमा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सुप्रिया सुळे यांनी देखील पतीच्या निधनानंतर वैधव्य आलेल्या महिलांसोबत वटपौर्णिमेची पूजा केली
  • ‘ग्लासात ग्लास छत्तीस ग्लास सदानंदराव फस्ट क्लास’- सुप्रिया सुळेंनी घेतला उखाणा
  • सुप्रिया सुळे यांनी विधवा महिलांसोबत साजरी केलेल्या वटपौर्णिमेच्या सणाचे सर्वत्र होतंय कौतुक

बारामतीच्या खासादार सुप्रिया सुळेंच्या अनोख्या वटपौर्णिमेची सध्या राज्यभरात चांगलीच चर्चा रंगली आहे. संपूर्ण राज्यात वट पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा होत असताना राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील पतीच्या निधनानंतर वैधव्य आलेल्या महिलांसोबत वटपौर्णिमेची पूजा करत सण साजरा केला. यादरम्यान, सुप्रिया सुळे यांनी उखाणाही घेतला. यानिमित्ताने त्यांनी समाजासमोर एक नवा आदर्श ठेवल्याचंही बोललं जात आहे. दरम्यानं, सुप्रिया सुळे यांनी विधवा महिलांसोबत साजरी केलेल्या वटपौर्णिमेच्या सणाबद्दल त्यांचे कौतुक देखील केले जात आहे.

अधिक वाचा : बोमन ईरानी यांच्यासाठी मुलीने केली भावुक पोस्ट

‘ग्लासात ग्लास छत्तीस ग्लास सदानंदराव फस्ट क्लास’- सुप्रिया सुळेंनी घेतला उखाणा

सुप्रिया सुळे यांनी वडाची पूजा करून वटपौर्णिमा साजरी केली. यावेळी ‘ग्लासात ग्लास छत्तीस ग्लास सदानंदराव फस्ट क्लास,’ असा उखाणा सुप्रिया सुळे यांनी घेतला. यावेळी उपस्थित महिलांनी टाळ्यांचा गजर केला. दरम्यानं, विधवा महिलांना कुठल्याही सण-समारंभात स्थान दिले जात नाही. याच परंपरेला फाटा देत सुप्रिया सुळे यांनी आज अमरावतीत विधवा महिलांसोबत वटपौर्णिमेचे पूजन करून एक नवा पायंडा पाडला असल्याने सुळे यांचे कौतुक केले जाऊ लागले आहे. त्याचबरोबर सुप्रिया सुळे आणि सदानंद यांना ज्येष्ठ महिलांनी यांना दिर्घायुष्य लाभो असे आशीर्वाद देखील दिले आहेत.

अधिक वाचा ; Astrology:राजांप्रमाणे आयुष्य जगतात या अक्षराच्या नावाचे लोक

पत्नीपिडीत पुरुषांनीही साजरी केली वटपोर्णिमा  

पत्नीपीडित पतींनी पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारत हीच पत्नी पुढचे सात जन्म नको म्हणून पिंपळाला फेऱ्या मारत यमराजाकडे मनोकामना केली औरंगाबाद येथे केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात उद्या वटपौर्णिमा सण साजरा केला जाणार आहे. या सणादिवशी पत्नी आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी पिंपळाच्या झाडाची पुजा करून सात जन्म तोच पती मिळावा अशी प्रार्थना करते. मात्र, पत्नी पिडीत पुरुषांनी आता आपल्याला ही बायको नको म्हणत वडाच्या झाडाची पूजा करत फेऱ्या देखील मारल्या आहेत.

अधिक वाचा ; अजितदादांच्या खांद्यावर पंतप्रधानांचा हात 

७ जन्मच काय ७ सेकंद सुद्धा अशी बायको नको – पुरुषांनी दिल्या घोषणा

दरम्यान, पत्नीपिडीत पुरुषांनी केलेल्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा राज्यभर होत आहे. पिंपळाच्या झाडाला गोल फिरत दोरा बांधून मुंजा असलेल्या पिंपळाच्या झाडाची पूजा या पत्नीपीडित पुरुषांनी केली. सोबतच पुढील ७ जन्मच काय ७ सेकंद सुद्धा अशी बायको नको, अशा घोषणा देखील देण्यात आल्या. पिंपळाच्या झाडाला उलट्या १०८  प्रदक्षिणा घालत पत्नीपीडित पुरुषांनी पूजन देखील केले आहे. तसेच पुरुषांना त्रास देणा-या महिलांचा सदर पुरुषांनी निषेध देखील केला. दरम्यान, औरंगाबादच्या वाळूज भागात असलेली पत्नीपीडित नावाची ही संघटना नेहमीच पत्नीच्या छळापासून त्रासलेल्य़ा नव-यांना मदत करण्याचे काम करते. यांच्या वतीने हे अनोखे आंदोलन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी