Nana Patole : महाविकास आघाडीतले वाद आले चव्हाट्यावर, नाना पटोलेंच्या वक्त्यव्यामुळे आघाडीत बिघाडी असल्याचे झाले स्पष्ट

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले आणि त्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. या तीन पक्षांची जरी आघाडी असली तरी आघाडीत बिघाडी असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसला कमकुवत करत आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

nana patole
नाना पटोले  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तीन पक्षांची जरी आघाडी असली तरी आघाडीत बिघाडी असल्याचे समोर आले आहे.
  • राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसला कमकुवत करत आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
  • राष्ट्रवादी पाठीत खंजीर खुपसत आहे असेही काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी विधान केले होते.

Nana Patole : नागपूर : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले आणि त्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. या तीन पक्षांची जरी आघाडी असली तरी आघाडीत बिघाडी असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसला कमकुवत करत आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसत आहे असेही काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी विधान केले होते.

नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, गेल्या काही वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाला कमकुवत करत आहे, तसेच जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींना विकास निधी दिला जात नाही असेही पटोले म्हणाले.

किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी नाही

किमान समान कार्यक्रमावर महाविकास आघाडीची स्थापना झालीए होती. परंतु या कार्यक्रमाची अंमलबजावणी होत नाही असेही पटोले म्हणाले. मैत्रीच्या आडून राष्ट्रवादी, काँग्रेससोबत दगा करत आहे असेही पटोले म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी