मोठी बातमी : अखेर केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश, अमरावतीतील उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास NIA कडे

NIA probe into Umesh Kolhe murder case in Amravati : अमरावतीतील केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक न्यायालयाने आरोपींना ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोल्हे यांच्या हत्येनंतर अनेक ठिकाणी निदर्शेन करण्यात आली होती. त्याचबरोबर कोल्हे यांचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून एनआयएकडे सोपवण्यात यावा अशी मागणी अमरावती येथील नागरिकांनी केली होती.

NIA probe into Umesh Kolhe murder case in Amravati
अमरावतीतील उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येचा तपास अखेर राष्ट्रीय तपास संस्थेकडे
  •  कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक
  • शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याने त्यांची हत्या झाल्याचा आरोप

अमरावती : महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येचा तपास अखेर राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) सोपवण्यात आला आहे. उमेश कोल्हे या व्यक्तीची हत्या झाल्यावर सदर घटनेचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) सोपवण्यात यावा अशी मागणी होऊ लागली होती. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपासाचे आदेश राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ अमरावती येथील केमिस्ट उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर उमेश कोळे यांना धमक्या येऊ लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर २१ जून रोजी कोल्हे यांची हत्या झाली होती.

अधिक वाचा : पवार बहुमत चाचणीला उपस्थित राहणार की नाही? स्वतः दिली माहिती

 कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक

दरम्यान, अमरावतीतील केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक न्यायालयाने आरोपींना ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोल्हे यांच्या हत्येनंतर अनेक ठिकाणी निदर्शेन करण्यात आली होती. त्याचबरोबर कोल्हे यांचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून एनआयएकडे सोपवण्यात यावा अशी मागणी अमरावती येथील नागरिकांनी केली होती. यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हे हत्याप्रकरणाचा तपास एनआयएला करण्याचे आदेश दिले आहेत. अमरावतीतील (Amaravati) कोल्हे हत्या प्रकरणाचा संबंध उदयपूरमधील कन्हैयालालच्या हत्येशी संबंध तर नाही ना, याचा तपास एनआयए करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अधिक वाचा : शिंदेंसोबत उद्धव ठाकरेंचा फोटो, ठाण्यात कोणी लावले हे बॅनर?

शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याने त्यांची हत्या झाल्याचा आरोप

कोल्हे यांच्या हत्येनंतर सदर हत्याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी भाजप नेते व खासदार अनिल बोंडे व भाजपचे राज्य प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, तुषार भारतीय यांनी केली होती. दरम्यान, अमरावती शहरातील केमिस्ट उमेश कोल्हे यांची २१ जूनला रात्री हत्या झाली होती. कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याने त्यांची हत्या झाल्याचा आरोप होत होता.

अधिक वाचा : प्रजनन क्षमता वाढवायची आहे? कलिंगडाच्या बिया खा 

एनआयए पथक आणि एटीएस पथक अमरावती शहरात पोहोचले

एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) पथक आणि एटीएस पथक कोल्हे प्रकरणाच्या चौकशीसाठी अमरावती शहरात पोहोचली आहे. दरम्यान चौकशीसाठी त्यांच्याकडून या प्रकरणाशी संबंधितांची स्थानिक पोलिसांकडून माहिती घेत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी