नागपूर : महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मागील आठवड्यापासून नागपूरचे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात आजचा दिवस तर चांगलाच गाजला. महाविकास आघाडीच्यावतीने आज थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला आहे. (No confidence motion against Rahul Narvekar, letter from 39 Mahavikas Aghadi MLAs)
अधिक वाचा : नववर्षाची शेतकऱ्यांना खास भेट! , धानउत्पादकांना हेक्टरी 15 हजार रुपयांचा बोनस जाहीर
हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरु आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीने कोंडीत पकडण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषीमंत्री अब्दुल सत्तर, उद्योगमंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मात्र, सरकारने त्याची दखल न घेल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु झाली. याचदरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे सरकारच्याविरोधात विरोधक एकवटले.
आज अधिवशेनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी सभागृहात सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर बोलू देत नसल्याने सभागृहात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर आक्षेप घेतला. घटनात्मक पदावरील व्यक्तीने संशयास्पद वागू नये, असा इशारा भास्कर जाधव यांनी दिला.
अधिक वाचा : डहाणूमधील आदिवासींच्या सर्वसमावेषकतेच्या दिशेने पाऊल
महाविकास आघाडीने थेट त्यांच्या विरोधातच अविश्वासाचा प्रस्ताव आणला. महाविकास आघाडीतील ३९ आमदारांच्या सह्यांचं पत्र घेऊन सुनील केदार, सुनील प्रभू, सुरेश वरपूडकर, अनिल पाटील हे विधानसभा सचिवांना जाऊन भेटले. विधानसभा अध्यक्ष नियमाबाह्य पद्धतीनं कामकाज चालवत असल्याची तक्रार या पत्रातून करण्यात आला आहे.