महाविकास आघाडीमध्ये एकही व्यक्ती समाधानी नाही - सुधीर मुनगंटीवार

नागपूर
भरत जाधव
Updated Apr 06, 2022 | 18:25 IST

महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) समतोल नसल्याच्या बातमी सध्या ऐकू येत आहेत. शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा सासेमिरा लागला आहे. परंतु राष्ट्रवादीकडे असलेलं गृहखातं मात्र भाजपच्या मंत्र्यांवर कारवाई करण्यास दिरंगाई करत असल्यानं शिवसेना आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज आहेत.

Sudhir Mungantiwar
महाविकास आघाडीमध्ये एकही व्यक्ती समाधानी नाही-मुनगंटीवार   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भाजप-राष्ट्रवादीत कोणतीही कटुता नाही, पण...; मुनगुंटीवारांनी दिले वेगळेच संकेत
  • राष्ट्रवादी,काँग्रेस आणि शिवसेना काही नाराजी आहे पण मला काही सोयरसुतक नाही. - सुधीर मुनगंटीवार
  • मुख्यमंत्र्यांना वाटतं गृहमंत्री सूडाच्या भावनेने वागत नाही.

नागपूर : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) समतोल नसल्याच्या बातमी सध्या ऐकू येत आहेत. शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा सासेमिरा लागला आहे. परंतु राष्ट्रवादीकडे असलेलं गृहखातं मात्र भाजपच्या मंत्र्यांवर कारवाई करण्यास दिरंगाई करत असल्यानं शिवसेना आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपली नाराजी थेट शरद पवारांच्या कानावर घातली आहे. याच धागा पकडत भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा दावा केला आहे. महाविकास आघाडीत कोणीच समाधानी नसल्याचा दावा मुनगंटीवार यांनी केला आहे.  

पत्रकारांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, प्रत्येक नेत्यांमध्ये एकमेंकांविषयी नाराजी आहे. मुख्यमंत्र्यांना वाटतं गृहमंत्री सूडाच्या भावनेने वागत नाही, कारवाई करत नाही. गृहमंत्री कोणाला अटक करत नाहीत म्हणून मुख्यमंत्री नाराज आहेत. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. काही लोकांचा स्वभाव असा झाला आहे स्वतःची चूक होते तेव्हा त्याच्या विरुद्धचे न्यायाधीश होतात आणि स्वतःची चूक लपवतात. हा दुटप्पीपणा आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना सीआरपीसी १६० मध्ये नोटीस जातो 138 कोटीच्या भारत देशामध्ये कॅबिनेट मंत्री  नारायण राणे साहेबांना 505,24 नोटीस जातो. प्रवीण दरेकर यांना नोटीस तेव्हा सत्यमेव जयते आणि आपल्यावर वेळ आली असत्यमेव जयते. मनातल्या वेदना शब्दातून व्यक्त झाल्या आहेत. आणि संपादक म्हणून महाराष्ट्राचे प्रश्न आता गौण झाले असून स्वतःच प्रश्न मोठे झाले आहे.. 

कंगना राणावतच्या घरावर बुलडोझर चालवून ऑफिस तोडलं होतं. तिनेदेखील मी कष्ट मेहनत करून ऑफिस बंधल्याच सांगितलं होत, आज संजय राऊत देखील तेच म्हणतात, दोघांमध्ये वैचारिक समानता आली हे एक मोठं यश मानलं पाहिजे, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे.सरकारमधील नाराज नेत्यांविषयी बोलताना ते म्हणाले की , या राज्यांमध्ये अनेक मंत्री असे आहेत, ज्यांना वाटतं की ज्या वेगाने आम्हाला पैसे खायचे आहे त्या वेगाने पैसे खाता येत नाही. अधिकारी मंत्र्यांच काम थांबवतात मंत्री मुख्य सचिवांची तक्रार करतात. शिवसेनेच्या अनेक खासदारांनी आपले दुःख वेदना व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादी,काँग्रेस आणि शिवसेना काही नाराजी आहे पण मला काही सोयरसुतक नाही. परंतु गडचिरोलीपासून गडिंग्लज पर्यंत जनता नाराज असल्याचं ते म्हणाले.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी