बुलढाणा : शेगावहून अकोटकडे जाणाऱ्या कारचे समोरील टायर फुटल्याने अनियंत्रित झालेली कार रस्त्यावरून खाली उतरून शेतात जाऊन उलटली. या अपघातात चारचाकी उलटून कारचा चेंदामेंदा झाला. या अपघातात १ जण जागीच ठार झाले असून ३ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. (One killed in car accident on Shegaon-Akot road)
शेगाव -अकोट मार्गावर कारला अपघात, १ ठार#accident pic.twitter.com/2ee9LFstof — Timesnowmarathi (@timesnowmarathi) May 23, 2022
जखमींना शेगावच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. लेनिया कंपनीची कार एमएच 28 व्ही 1357 या कारमधून ही भरधाव वेगाने शेगावरून अकोटकडे जात असतांना बाळापूर तालुक्यातील लोहारा गावाजवळ कारच्या समोरील बाजूचा टायर फुटला. त्यामुळे अनियंत्रित झालेली कार रस्ता रस्त्याच्या बाजूने असलेल्या शेतात जाऊन आदळली.
कारचे ट्राय फुटताच ती खाली शेतात गेल्याने दोन पलट्या खाल्ल्या त्यात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघात संजय लक्ष्मण शेंडे वय ६० राहणार जगदंबा नगर शेगाव हे जागीच ठार झाले तर कार मधील ३ जण गंभीर जखमी झाले. जखमींना शेगावच्या एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.