नागपूर : गोसेखुर्दच्या बॅक वॉटरमधून नावेतून जात असताना एक मोठी दुर्घटना घडली आहे. ज्यामध्ये ५ महिला पाण्यात बुडाल्या आहेत. या पाचही महिला नावेतून जात असताना नाव उलटून पाच महिला बुडाल्या आहेत. नागपूरच्या कुही येथे सदर दुर्घटना घडली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत नावेतून जात असलेल्या पाच पैकी एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन महिलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. सदर महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर यामध्ये एक महिला बालबाल बचावली आहे. या घटनेमुळे सदर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, एक महिलेच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. गोसेखुर्दच्या बॅक वॉटरमधून नावेतून जात असताना नाव बुडाल्याने ही दुर्देवी घटना घडली. या पाचही महिला मिरची तोडणी आणि कापूस वेचणीच्या कामाला जात जाऊन आपला उदरनिर्वाह करत होत्या. सदर घटना घडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी देखील तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, पंचनामा केला असून दुर्घटना घडण्याचे नेमके कारण काय याचा तपास सुरू केला आहे.
दरम्यान, सदर दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेचे नाव गीता रामाजी निंबर्ते असं आहे. मृत्यू पावलेल्या गीता यांना दीड वर्षाचा एक मुलगा आहे. गीता यांचा एक छोटासा परिवार आहे. त्यांच्या परिवारात त्यांचा एक दीड वर्षाचा मुलगा आणि पती राहत होते. आता गीता यांचा मृत्यू झाल्याने या चिमुकल्याच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या सर्व महिला मौजा कुजबा येथील असल्याची माहिती मिळत आहे.
या पाचही महिला मिरची तोडणी आणि कापूस वेचणीच्या कामाला जात जाऊन आपला उदरनिर्वाह करत होत्या. त्यामुळे पाचही महिला कापूस वेचण्यासाठी आणि मिरची तोडणीसाठी आम नदी ओलांडून जात होत्या. शेतमालक परमानंद तिजारे यांच्या शेतातून त्या नावेने जात होत्या. मात्र, दुर्दैवाने नदी ओलांडत असताना नदीच्या पात्रात अचानक नाव फुटली. त्यामुळे नावेत पाणी शिरले आणि नाव बुडाली. या महिलांना बचावासाठी आरडोओरड केली. मात्र, त्यांना नागरिक बचावाला जाण्यासाठी जाईपर्यंत नाव बुडाल्याने या महिला गंटागळ्या खात होत्या. त्यांच्या नाका तोंडात पाणी शिरले होते आणि यातच त्यातील गीता रामदास निंबारते यांचा मात्र बुडून मृत्यू झाला. मात्र, यामध्ये ४ महिला या वाचल्या आहेत.
मनू सुरेश साळवे, मनीषा राजू ठवकर, लक्ष्मी लोमेश्वर गिरी, मंगला देवराव भोयर व परमानंद रामचंद्र तिजारे या चार महिला वाचल्या आहेत. लक्ष्मी लोमेश्वर गिरी व परमानंद रामचंद्र तिजारे यांच्यावर नागपूर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. तर, यातील दोघींवर मांढळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.