Local body election campaign In Bhandara : लाखणी: लाखणी (Lakhani) येथे उमेदवाराच्या प्रचारासाठी आले असता देवेंद्र फडणवीस यांनी हा घणाघाती हल्ला चढवला. हे सरकार हरवलेले असून दारू विकणाऱ्यांचे आहे. या हरवलेल्या सरकारच्या काळात शेतकरी संकटात असल्याची टीका विरोधी पक्षनेते (Leader of the Opposition) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. फडणवीस हे सध्या भंडारा (Bhandara) दौऱ्यावर असून, भंडारा येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local self-government bodies) निवडणुकांच्या प्रचारादरम्यान (Election campaign) सभेत त्यांनी आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
हे सरकार सामान्य माणसांचं नाही. सामान्य माणसाच्या विरोधातील हे सरकार आहे. या सरकारला तुम्हीच खाली आणू शकता असं सांगतानाच हे सरकार हरवलं असून शोधून देणाऱ्यास पुरस्कार देऊ, असं फडणवीस म्हणाले.राज्यातील आघाडी सर्व सामान्यांचे राहिले नाही. हे सरकार काम करताना दिसत नाही. हे सरकारच हरवले आहे, असा घणाघाती हल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चढवला.
मी मुख्यमंत्री असताना धानाचा बोनस देण्याची सुरुवात केली. पूर्वी आम्ही सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घोषणा करायचो. पण या सरकारने बोनसच बंद केला आहे, असं सांगतानाच नाना पटोले म्हणतात संविधान खतरे में है. पण खरेत कर धान पीक घेणारे शेतकरीच खरे खतरे में आहेत, असा हल्लाही फडणवीस यांनी यावेळी चढवला. आम्ही 5 वर्षात एकाही शेतकऱ्यांची वीज कापली नाही. मात्र या सरकारच्या काळात रोज वीज कापली जात आहे. एका डीपीवर 4 शेतकऱ्यांनी वीज भरली नाही तर पूर्ण डीपी काढून नेण्याचे काम केले गेले आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या काळात या सरकारने जराही मदत केली नाही. बार मालक शरद पवारांकडे गेले. तिथे गेल्यावर त्यांनी लायसन्स फी कमी करून घेतली. विदेशी दारुवर 50 टक्के कर माफ करून घेतला. विदेशी दारु स्वत झाली. हे दीन दलित, गरीबांचे सरकार नसून दारु विकणाऱ्यांचे सरकार असल्याची टीका देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली.
या सरकारला मराठा आरक्षण देता आले नाही. ओबीसी आरक्षण रद्द करण्याचे पाप या सरकारने केले आहे. ओबीसी आरक्षण रद्द केल्याने ओबीसींचे राजकीय प्रतिनिधीत्वच धोक्यात आले आहे. या सरकारने इम्पिरिकल डेटा वेळीच जमा केला असतास तर आज ही वेळ आली नसती.