पंकजा मुंडेंची पुन्हा खदखद, विधान परिषदेचे तिकीट कापल्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या....

Pankaja Munde was denied a ticket to the Legislative Council : तुम्हाला दहा परिक्रमा करेल, मला अजून कुठल्या परिक्रमेची आवश्यकता नाही. असं पंकजा मुंडे म्हणाल्या. एखादी संधी नाही मिळाली तर नाही. पण लोकांच्या सेवेची संधी सोडायची नाही ही शपथ गोपीनाथ मुंडे साहेबांना अग्नि देताना घेतली आहे - पंकजा मुंडे

Pankaja Munde was denied a ticket to the Legislative Council
विधान परिषदेचे तिकीट कापल्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या....  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तुम्हाला दहा परिक्रमा करेल, मला अजून कुठल्या परिक्रमेची आवश्यकता नाही – पंकजा मुंडे
  • विधानसभेचं तिकीट कापण्यात आलेल्या बावनकुळेंना मात्र ही संधी देण्यात आली
  • तिकीट कापल्यानंतरही बावनकुळे यांनी कोणतीही खळखळ केली नव्हती

Pankaja Munde was denied a ticket  बुलडाणा : भारतीय जनता पार्टीच्या माजी मंत्री तथा नेत्या पंकजा मुंडे यांची विधान परिषदेची उमेदवारी पुन्हा एकदा कापली आहे. त्यामुळे, पंकजा मुंडे यांनी मनातील खदखद बोलावून दाखवली आहे. दरम्यान, भाजपने विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. ज्यामध्ये भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेवर वर्णी लावण्यात आली आहे.

तुम्हाला दहा परिक्रमा करेल, मला अजून कुठल्या परिक्रमेची आवश्यकता नाही – पंकजा मुंडे

एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होईल. पण कुणासमोर हात फैलावून कुठल्या पदाची मागणी करण्याची आमच्या रक्तात सवय नाही. माझे माता-पिता माझे सर्वस्व तुम्ही आहात. तुम्हाला दहा परिक्रमा करेल, मला अजून कुठल्या परिक्रमेची आवश्यकता नाही. असं पंकजा मुंडे म्हणाल्या. एखादी संधी नाही मिळाली तर नाही. पण लोकांच्या सेवेची संधी सोडायची नाही ही शपथ गोपीनाथ मुंडे साहेबांना अग्नि देताना घेतली आहे. मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही, अशी खदखद पंकजा यांनी व्यक्त केली. बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यता आला होता. यावेळी पंकजा मुंडे यांची खदखद समोर आल्याचं पाहायला मिळालं.

विधानसभेचं तिकीट कापण्यात आलेल्या बावनकुळेंना मात्र ही संधी देण्यात आली

द्रम्यान पक्षश्रेष्ठींनी पंकजा यांना यावेळीही विधान परिषदेची संधी दिली नाही. मात्र, विधानसभेचं तिकीट कापण्यात आलेल्या बावनकुळेंना मात्र ही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी मनातील खदखद व्यक्त करतानाच पक्षश्रेष्ठींना अप्रत्यक्ष टोले लगावल्याचं बोललं जात आहे. अमल महाडिक, अमरिश पटेल, चंद्रशेखर बावनकुळे, वसंत खंडेलवाल आणि राजहंस सिंह यांना भाजपने दोन दिवसांपूर्वीच विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर केली. यावेळी विधान परिषदेवर पंकजा मुंडे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी पंकजा मुंडे यांची उमेदवारी टाळल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. 

तिकीट कापल्यानंतरही बावनकुळे यांनी कोणतीही खळखळ केली नव्हती

२०१९ च्या विधानसभेचे तिकीट कापले गेले होते. मात्र, बावनकुळे यांनी कोणतीही खळखळ केली नव्हती. स्वत:चं तिकीट कापलेलं असतानाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळली होती. शिवाय ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असो की वीज शुल्क माफीचा प्रश्न असो त्यांनी प्रत्येक मुद्द्यावर आंदोलन करत सरकारला घेरलं होतं. त्याचा फायदा बावनकुळे यांना आता मिळाला असल्याचं बोललं जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी