Crime News अपहरण केलेल्या मुलीला घरी सोडताच अपरहणकर्त्याचा गेला जीव, वाचा नेमकं काय घडलं

people killed kidnapper in amaravati District : मुलीच्या अपहरणानंतर आरोपींना कडक शिक्षा देण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. आरोपीला अटक करण्यासाठी नागरिकांनी चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनवर मोर्चा देखील काढण्यात आला होता. मात्र, आरोपीला पकडण्याअगोदरच त्याचा अज्ञात हल्लेखोराने खून केला असल्याचे समोर आले आहे.

people killed kidnapper in amaravati District
अपहरण केलेल्या मुलीला घरी सोडताच अपरहणकर्त्याचा गेला जीव  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अपहरण केलेल्या मुलीला अपहरणकर्त्याने मध्यरात्रीच्या सुमारास परत तिच्या घरी घरी आणून सोडलं होते
  • मुलीला घरी सोडल्यानंतर आरोपीचा काही वेळातच अज्ञात जमावाने केला खून
  • आरोपींनी कुटुंबातील सदस्यांसमोरच मुलीला चाकूचा धाक दाखवत मुलीला जबरदस्तीने ओढून गाडीत बसवून घेऊन गेले होते

अमरावती : अपहरण (Abduction) केलेल्या मुलीला अपहरणकर्त्याने मध्यरात्रीच्या सुमारास परत तिच्या घरी घरी आणून सोडलं. मात्र, यानंतर त्याच अपहरणकर्त्याचा खून (Murder) झाल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यात (Amaravati District) घडली आहे. अपहरणकर्त्याने  मध्यरात्रीच्या सुमारास मुलीला घरी आणून सोडल्यानंतर त्याच परिसरात अपहरणकर्त्याचा खून झाला आहे. सदर अपहरणकर्त्याचे नाव नईम खान असं आहे. नईम खानवर अज्ञात हल्लेखोराने हल्ला केला होता, या हल्ल्यात नईमचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटना अमरावती जिल्ह्यतील चांदूर रेल्वे परिसरात ही हत्येची घटना घडली आहे. चांदुर रेल्वे पोलिसांकडून सध्या या घटनेचा तपास सुरू आहे. (people killed kidnapper in amaravati District )

अधिक वाचा ;  रात्री Instagram यूजर्सं संतापले, थेट Twitter वर केली तक्रार

चाकूचा धाक दाखवत मुलीचे केले होते अपहरण

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी सदर मुलीचे चाकूचा धाक दाखवत अपहरण केले होते. मुलीच्या अपहरणानंतर आरोपींना कडक शिक्षा देण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. आरोपीला अटक करण्यासाठी नागरिकांनी चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनवर मोर्चा देखील काढण्यात आला  होता. मात्र, आरोपीला पकडण्याअगोदरच त्याचा अज्ञात हल्लेखोराने खून केला असल्याचे समोर आले आहे. आरोपीने मध्यरात्री मुलीला  घरी आणून सोडलं. त्याच परिसरात अज्ञात हल्लेखोरांकडून त्याचा खून करण्यात आला आहे. या घटनेनंतर चांदूर रेल्वेत पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अधिक वाचा : PFI च्या ठिकाणांवर छापेमारी मग बजरंग दलावर कारवाई का नाही? 

आरोपींनी कुटुंबातील सदस्यांसमोरच मुलीला चाकूचा धाक दाखवत मुलीला जबरदस्तीने ओढून गाडीत बसवून घेऊन गेले होते

सदर घटना २१ सप्टेंबर रोजी घडली आहे. आरोपी हे एका चारचाकी वाहनातून आले होते.  चाकूच्या धाकावर अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं होतं. या ठिकाणी त्यांनी कुटुंबातील सदस्यांसमोरच चाकूचा धाक दाखवत मुलीला जबरदस्तीने ओढून गाडीत बसवून घेऊन गेले. सदर घटनेनंतर अल्पवयीन मुलीच्या कुटुंबातील सदस्य घाबरून पोलिसात गेले होते. त्यांनी चांदूर रेल्वे पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणी मुलगी आणि आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना झाली होती. मात्र, आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. एक दिवस उलटून गेल्यावरही मुलगी न सापडल्याने कुटुंबियांनी पोलीस स्टेशनबाहेर गर्दी केली होती. मुलीला परत आणण्यासाठी कुटुंबीय, नातेवाईक आणि समाज बांधवांनी पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढला होता. पोलीस मुलीला शोधण्याचा प्रयत्न करत असतानाच आरोपीने गुरुवारी रात्री अल्पवयीन मुलीला घरी आणून सोडलं.

अधिक वाचा : नवरात्रीमध्ये चुकूनही करू नका या गोष्टी, येतील मोठ्या समस्या

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी