police arrested to ncp yuvati worker राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकारी असलेल्या युवतीला बेड्या, वाहन चोरीचा करत होती गोरखधंदा

police arrested to ncp yuvati worker ; राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे १८ आणि १९ तारखेला चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र, त्यांच्या येण्याअगोदर हा धक्कादायक प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

police arrested to ncp yuvati worker
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकारी युवतीला बेड्या   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तरुणी आपल्या २ साथीदारांसह एक खास शक्कल वापरून ही तरुणी मोपेड चोरी करत होती
  • निर्जनस्थळी मेकॅनिकच्या साथीनं गाडी सुरु करून तिची विक्री केली जायची
  • शरद पवार १८ आणि १९ तारखेला चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत

police arrested to ncp yuvati worker  । चंद्रपूर : ११ गाड्याची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. चोरी करणाऱ्या टोळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची चंद्रपूर शहर युवती प्रमुखचं असल्याने पोलिसांना मात्र मोठा धक्का बसला आहे. वैष्णवी देवतळे असं या अटक करण्यात आलेल्या तरुणीचं नाव आहे. चंद्रपूर शहरातील वेगवेगळ्या भागातून चोरी केलेल्या तब्बल ११ मोपेड गाड्या चोरी करणाऱ्या ३ जणांच्या एका टोळीला स्थानिक गुन्हे शाखेनं ४ दिवस आधी अटक केली होती. मात्र या तिघांपैकी एक असलेली आरोपी युवती राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी असल्याचे समजताच पोलिसांना देखील धक्का बसला. सदर तरुणी आपल्या २ साथीदारांसह एक खास शक्कल वापरून ही तरुणी मोपेड चोरी करत होती, अशी धक्कादायक बाब या तपासात स्पष्ट झाली आहे. (police arrested to ncp yuvati worker for stealing a vehicles)

शरद पवार १८ आणि १९ तारखेला चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत

दरम्यान,  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे १८ आणि १९ तारखेला चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र, त्यांच्या येण्याअगोदर हा धक्कादायक प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, राजकीय पक्षाची कार्यकर्ता असल्यामुळे पोलिसांनी वैष्णवीच्या नावाबाबत गुप्तता देखील पाळली असून, त्यासाठी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेतून शहर युवती प्रमुखाचं नाव का वगळण्यात आलं? याची कार्यकर्त्यांमध्ये मोठी चर्चा झाली आणि यातूनच वैष्णवी ही गाडी चोरीच्या प्रकरणात आरोपी असल्याची बाब पुढे आली आहे.

निर्जनस्थळी मेकॅनिकच्या साथीनं गाडी सुरु करून तिची विक्री केली जायची

वैष्णवी आपल्या दोन साथीदारांसह विशिष्ट पद्धत वापरून लॉक नसलेल्या मोपेड गाड्या चोरी करत असल्याचं तपासात उघड झाल आहे. सदर राष्ट्रवादीची कार्यकर्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अतिशय सक्रिय होती. संधी साधून वैष्णवी त्या गाडीवर बसायची आणि तिचा साथीदार तिच्या गाडीतील पेट्रोल संपलं आहे, असं भासवून दुसऱ्या वाहनाने टोचन करायचा. आणि नंतर निर्जनस्थळी मेकॅनिकच्या साथीनं गाडी सुरु करून तिची विक्री केली जायची. एखाद्या गर्दीच्या ठिकाणी लॉक नसलेल्या वाहनावर ही टोळी लक्ष ठेवत असे. पोलीस तपासात या सर्व बाबी स्पष्ट झाल्या आहेत.

पॉलिटेकनिक तृतीय वर्षांची विद्यार्थिनी असलेल्या वैष्णवीची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण आहे

चोरी मागील कारण काहीही असलं तरी तिच्या अटकेमुळं १८ आणि १९ तारखेला होणाऱ्या शरद पवार यांच्या चंद्रपूर दौऱ्याच्या ऐन तोंडावर जिल्ह्यातील नेत्यांवर मोठी नामुष्की ओढवली आहे. पॉलिटेकनिक तृतीय वर्षांची विद्यार्थिनी असलेल्या वैष्णवीची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण आहे. त्यामुळे पैसे कमविण्यासाठी नाहीतर मनीष पाल या मित्रामुळे ती गाडी चोरीच्या धंद्यात ओढली गेल्याची माहिती पोलीस विभागातील सूत्रांनी दिली आहे.

 

तीनही आरोपींना आणि  २ दिवसांची पोलीस कोठडी

सध्या या प्रकरणात ११ गाड्या जप्त करण्यात आल्या असल्यातरी यामुळे गाडी चोरीच्या आणखी काही प्रकरणांचा खुलासा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीसांनी वैष्णवीसह तिचा मित्र मनीष पाल आणि मेकॅनिक असलेल्या सौरभ चंदनखेडे अशा तीनही आरोपींना अटक केली आहे. त्यांची २ दिवसांची पोलीस कोठडी मिळवली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी