पोलिसांनी टाकली कोंबड बाजावर धाड, तब्बल रएवढ्या लाखाचा मुद्देमाल जप्त, जंगलात भरवला जात होता कोंबड बाजार

police raidedthe chicken battle in yavatamal : पोलिसांनी केसुर्ली जंगलात कुणालाही न कळता गुप्त पद्धतीने अतिशय शिताफीने सुरु असलेल्या कोंबड बाजारावर धाड टाकली. पोलिसांनी जेव्हा घटनास्थळी धाड टाकली यावेळी घटनास्थळी असलेले लोक जंगलात सैरावैरा पळत सुटले असल्याचं चित्र पहायला मिळाले. मात्र, पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. परंतु ज्यावर पैशाची बाजी लावली जाते तो झुंजीचा कोंबडा पोलिसांच्या हाती लागला, परंतु तो मृत अवस्थेत मिळाला.

police raidedthe chicken battle in yavatamal
पोलिसांनी टाकली कोंबड बाजावर धाड,एवढ्या लाखाचा मुद्देमाल जप्  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पोलिसांनी टाकली कोंबड बाजावर धाड
  • पोलिसांनी घटना स्थळावरून तब्बल २१ दुचाक्या जप्त केल्या
  • झुंजीचा कोंबडा पोलिसांच्या हाती लागला, मात्र तो मृत अवस्थेत मिळाला

यवतमाळ :  पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून टाकलेल्या धाडीत तब्बल ६ आरोपीसह तब्बल ७ लाख २६ हजार ९५० रुपयांचा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वणी तालुक्यातील केसुर्ली गावात लगत असलेल्या जंगलात कोंबड बाजार भरवला जात असल्याची गुप्त माहिती पोलीस खबऱ्याद्वारे पोलिसांना मिळाली होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सायंकाळी घटनास्थळी धाड टाकून कोंबड्याच्या झुंजीवर पैशाची बाजी खेळणाऱ्या सहा आरोपींना अटक केली आहे. तसेच घटनास्थळावरून पोलिसांनी ७ लाख २५ हजार ९५० रुपयांचा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.

अधिक वाचा ; विमानाचे तिकिट बुकिंग फक्त 100 रुपयांमध्ये! आयआरसीटीसी ऑफर

झुंजीचा कोंबडा पोलिसांच्या हाती लागला, मात्र तो मृत अवस्थेत मिळाला

मिळालेल्या महितुनुसार, पोलिसांनी केसुर्ली जंगलात कुणालाही न कळता गुप्त पद्धतीने अतिशय शिताफीने सुरु असलेल्या कोंबड बाजारावर धाड टाकली. पोलिसांनी जेव्हा घटनास्थळी धाड टाकली यावेळी घटनास्थळी असलेले लोक जंगलात सैरावैरा पळत सुटले असल्याचं चित्र पहायला मिळाले. मात्र, पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. परंतु ज्यावर पैशाची बाजी लावली जाते तो झुंजीचा कोंबडा पोलिसांच्या हाती लागला, परंतु तो मृत अवस्थेत मिळाला. त्याचबरोबर कोंबड बाजारावर पोलिसांनी धाड टाकल्यानंतर कोंबड्याची झुंज लावणारे तर हाती लागतात, पण कोंबडेच पळून जात असल्याचे चित्र कोंबड बाजारावरील धाडीत पहायला मिळते. 

अधिक वाचा ; नाव उलटून दुर्घटना; १० बुडाले,एका कुटुंबातील ७ जणांचा समावेश 

पोलिसांनी घटना स्थळावरून तब्बल २१ दुचाक्या जप्त केल्या

सदर कार्यवाही अप्पर पोलिस अधिक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रामकृष्ण महल्ले, यांनी केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी घटना स्थळावरून तब्बल २१ दुचाक्या जप्त केल्या. तर कोंबड्याच्या झुंजीवर पैशाची बाजी खेळणाऱ्या आरोपींजवळून रोख ११ हजार ३५० रुपये जप्त करण्यात आले. त्याच्याप्रमाणे एक मरणासन्न अवस्थेत असलेला कोंबडा, दोन लोखंडी धारदार कात्या असा एकूण ७ लाख २६ हजार ९५० रुपयांचा मोठा मुद्देमाल पोलिसांनी या धाडीत जप्त केला.  पोलिसांनी कोंबडे भांडवणाऱ्या सहा जणांना घटना स्थळावर घेराव घालून अटक केली.

अधिक वाचा : सनफ्लॉवर ऑइल द्या अन् आमच्याकडून बीअर घ्या; काय आहे ही स्कीम

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी