राज्यात लवकरच ७ ते ८ हजार पदांसाठी होणार पोलीस भरती, गृहमंत्र्यांची माहिती

नागपूर
Updated Jan 14, 2020 | 12:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

महाविकास आघाडीच्या गृहविभागाने सध्या मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला असून या अंतर्गत पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याच येणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.

Police recruitment on seven to eight thousand post very soon, says Home minister Anil Deshmukh
राज्यात लवकरच ७ ते ८ हजार पदांसाठी होणार पोलीस भरती, गृहमंत्र्यांची माहिती  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • लवकरच गृह विभाग सात ते आठ हजार पोलीस पदांवर पोलीस भरती करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
  • या पोलीस भरतीमुळे राज्यातील पोलिसांवरील कामाचा ताण काही प्रमाणात कमी होणार असल्याची चर्चा आहे.
  • कायदा तसेच सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकार पावलं उचलणार आहे.

नागपूर: महाविकास आघाडीच्या गृहविभागाने सध्या मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला असून या अंतर्गत पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याच येणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. देशभराती सध्या बेरोजगारीच्या समस्येने विळखा घातला आहे. अशातच रोजगाराबाबत दिलासादायक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याअंतर्गत लवकरच गृह विभाग सात ते आठ हजार पोलीस पदांवर पोलीस भरती करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

दिवंगत जे डी पाटील उपाख्य बाबासाहेब सांगळूदकर यांच्या ५१व्या पुण्यतिथीनिमित्त दर्यापूर येथील श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात गृहमंत्री बोलत होते. तसेच या पोलीस भरतीमुळे राज्यातील पोलिसांवरील कामाचा ताण काही प्रमाणात कमी होणार असल्याची चर्चा आहे. कायदा तसेच सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकार पावलं उचलणार आहे. नक्षलवाद तसेच अवैध सावकारी याला आळा घालण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणार असल्याचेही यावेळी देशमुख यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी पोलीस भरतीसह इतर विविध स्पर्धा परिक्षांसाठीदेखील ग्रामीण भागातील तरूणांनी अभ्यासात सातत्य ठेवत तयारी करायला हवी असे व्यक्त केले.

राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठीदेखील महत्त्वपूर्ण पावलं उचलली जाणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येबाबत देशमुख यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच याबाबत बोलताना त्यांनी पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नये असे आवाहनही केले आहे.

दरम्यान, गृहमंत्र्यांनी नियोजन केलेली पोलीस भरती कधी व कशाप्रकारे होईल याबाबत अद्याप खात्रीशीर माहिती मिळालेली नाही. मात्र, सात ते आठ हजार पदांसाठी ही पोलीस भरती असेल असे गृहमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. सध्या पोलीस दलात अनेक लहान आणि मोठ्या पदांवर भरती झालेली नाही. तसेच कित्येक महत्त्वाची पदे ही रिक्त आहेत. अशात राज्यातील पोलीस दलाला गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालणे कठीण होत असल्याचे चित्र आहे. त्यासाठी अशाप्रकारे पोलीस भरती तातडीने अंमलात आणणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी