पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: यवतमाळमध्ये पूजा अरुण राठोडचा झाला होता गर्भपात, ही तरूणी कोण

नागपूर
अजहर शेख
Updated Feb 17, 2021 | 18:19 IST

pooja chavan sucide case big breaking : व्हायरल झालेल्या क्लीपमधील आवाज हा अरूण राठोडचं असल्याचे समोर आले आहे. त्यावरून असलेलं कनेक्शन म्हणजे पूजा चव्हाण हीच पूजा अरूण राठोड असावी असा अंदाज लावला जातोय

pooja chavan sucide case big breaking
यवतमाळमध्ये पूजा अरुण राठोडचा झाला होता गर्भपात   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • ऑडीओ क्लीप मध्ये प्रेग्नन्सी प्रेग्नंसीबाबत चर्चा
  • ६ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजून ३४ मिनिटांनी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली होती
  • डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याचा पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये उल्लेख

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (pooja chavan sucide case) रोज नवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान, सदर प्रकरणात आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पूजा अरूण राठोड (pooja arun rathod) नावाच्या मुलीचा गर्भपात झाल्याची नोंद यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाली असल्याचे समोर आले आहे. ही पूजा अरूण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का याबाबत कुठलीही माहिती अद्याप मिळालेली नाही.

असा लागतोय घटनेशी संबंध?

दरम्यान आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव हे पूजा चव्हाण असे आहे. आणि या प्रकरणात ११ ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत. त्या व्हायरल झालेल्या क्लीपमधील आवाज हा अरूण राठोडचं असल्याचे समोर आले आहे. त्यावरून असलेलं कनेक्शन म्हणजे पूजा चव्हाण हीच पूजा अरूण राठोड असावी, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. मात्र, याबाबत कोणतीही पुष्टी अद्याप पर्यंत झाली नाही.

ऑडीओ क्लीपमध्ये प्रेग्नन्सी प्रेग्नंसीबाबत चर्चा

व्हायरल झालेल्या ११ ऑडीओ क्लीपपैकी एका ऑडीओ क्लीप मध्ये कथित मंत्री आणि अरूण राठोड यांची ही प्रेग्नन्सीबाबत चर्चा होताना समोर आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही माहिती महत्त्वपूर्ण मानली जाते आहे.

६ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजून ३४ मिनिटांनी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली होती

दरम्यान मिळालेली माहिती अशी की, पूजा अरूण राठोड ही ६ फेब्रुवारीला रोजी पहाटे ४ वाजून ३४ मिनिटांनी रूग्णालयामध्ये दाखल झाली होती अशी माहिती समोर आली आहे. तशी नोंद रुग्णालयाच्या अहवालात देखील झाली आहे. पूजा अरूण राठोड हिचा वॉर्ड क्रमांक ३ होता आणि डॉ. श्रीकांत वराडे यांनी तिच्यावर उपचार केल्याचं देखील रिपोर्टमध्ये दिसतं आहे.

डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याचा पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये उल्लेख

पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली असून, पूजा चव्हाणचा मृत्यू डोक्याला मार लागून झाला असल्याचा अहवाल पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये आला आहे अशी माहिती दीपक लगड यांनी हेमंत नगराळे यांना दिली. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पूजा चव्हाणने ७ फेब्रुवारी रोजी पुण्यात आत्महत्या केली होती. तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आपलं जीवन संपवलं आहे.

पुण्यात ती स्पोकन इंग्लिशच्या कोर्ससाठी आली होती

पूजा चव्हाणने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. तिच्या डोक्याला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे समोर आले आहे. पूजाचे बीएचं शिक्षण पूर्ण झालं होतं. पूजा तिच्या चुलत भाऊ आणि एका मित्रासोबत पुण्यात राहत होती. पुण्यात ती स्पोकन इंग्लिशच्या कोर्ससाठी आली होती. पुण्यात येऊन दोनच आठवडे झाले होते तोच तिने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी