पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; मंत्री संजय राठोड मंगळवारी सहकुटुंब 'या' ठिकाणी येणार

नागपूर
अजहर शेख
Updated Feb 20, 2021 | 20:36 IST

pooja chavan sucide case :राठोड हे येत्या मंगळवारी २३ तारखेला पोहरादेवीला येणार आहेत.ते सहकुटुंब येऊन आणि देवीचं दर्शन घेतील, असं सुनील महाराज यांनी स्पष्ट केलं आहे. राठोड यांना पोहरादेवीला येण्याच निमंत्रण दिल

pooja chavan sucide case
संजय राठोड मंगळवारी सहकुटुंब 'या' ठिकाणी येणार  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून दिली माहिती
  • संजय राठोड हे अनेक दिवसांनी सर्वांसमक्ष येणार
  • संजय राठोड सहकुटुंब येऊन देवीचं दर्शन घेतील - सुनील महाराज

वाशिम: पूजा चव्हाण (pooja chavan) आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड (sanjay rathod) यांचे नाव समोर आल्यानंतर सदर प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. दरम्यान, राज्याचे वन मंत्री संजय राठोड हे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर गायब झाले होते. यावर, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी चांगलीच टीका केली होती. मात्र, संजय राठोड हे अनेक दिवसांनी सर्वांसमक्ष येणार असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या मंगळवारी ते वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे येऊन देवीचं दर्शन घेणार असून, यावेळी संजय राठोड हे मीडियाशी बोलणार असून, ते काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी दिली माहिती

संजय राठोड हे येत्या मंगळवारी २३ तारखेला पोहरादेवीला येणार आहेत. ते सहकुटुंब येऊन आणि देवीचं दर्शन घेतील, असं सुनील महाराज यांनी स्पष्ट केलं आहे. संजय राठोड यांना आम्ही पोहरादेवीला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधून ही माहिती दिली. यांच्या कार्यालयातून आम्हाला त्यांच्या भेटीची अधिकृत माहिती देण्यात आली आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण नेमकं काय?

पूजा चव्हाण ही २२ वर्षाची तरुणी होती. पूजा ही मुळची बीड जिल्ह्यातील परळीची होती. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात रहात होती. तिने ७ फेब्रुवारीला पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून मृत्यू झाला. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. मात्र, पूजा चव्हाणने आत्महत्या केली? की तिची हत्या झाली? याची पुष्टी अद्याप पर्यत झाली नाही. दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर सदर प्रकरणाला राजकीय वळण लागले. या प्रकरणाची तक्रार भाजपने रितसर तक्रार दाखल केली होती. पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांची ऑडिओ क्लिप समोर आली. एक-दोन नव्हे तर तब्बल १२ ऑडिओ क्लिपमुळे चक्रव्यूहात सापडले आहेत. दरम्यान, मंत्री संजय राठोड हे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर गायब झाले होते. मात्र, ते मंगळवारी माध्यमांशी संवाद साधणार असल्याचे बोलले जात आहे. संजय राठोड नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मुख्य आरोपी बेपत्ता आहेत – चित्रा वाघ

चित्रा वाघ म्हणाल्या, मुख्य आरोपी जो आहे त्याची चौकशीच झाली नाही किंबहुना तो बेपत्ता आहे. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटत आहे की, सत्ताधारी पक्षातील मोठे मोठे नेते सांगत आहेत की, संजय राठोड आमच्या संपर्कात आहे. परंतु तुमच्या संपर्कात राहून काय करायचं त्यांनी जनतेच्या संपर्कात राहील पाहिजे. मात्र, ते तर बेपत्ता आहेत. सर्वजण शोधत आहेत, परंतु कुठेच संजय राठोड मिळून येत नाही आणि जर तुमच्या संपर्कात असतील तर तुम्हीच त्यांना संपर्कात ठेवणार का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामध्ये प्रत्येक नेता असं सांगतो की, ते निर्दोष आहेत. जर ते निर्दोष असतील तर त्यांनी समोर येऊन सांगावं असं देखील चित्रा वाघ म्हणाल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी