प्राध्यापक पतीचा वनरक्षक पत्नीने केली हत्या, गोंदलेल्या नावावरून लागला हत्येचा छडा

Professor husband killed by forest guard wife : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राध्यापक असलेल्या पतीच्या हत्येत पत्नी व तिच्या प्रियकराचा सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांनी दिली आहे. सचिन देशमुख यांच्या चुलत भाऊ हर्षद नागोराव देशमुख यांना वैद्यकीय अहवालात काही बाबींवर संशय आला होता.

Professor husband killed by forest guard wife
प्राध्यापक पतीचा वनरक्षक पत्नीने केली हत्या, असा झाला उलघडा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • प्राध्यापक पतीचा वन विभागात वनरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पत्नीने हत्या केली
  • पत्नी व तिच्या प्रियकराचा सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न
  • पोलिसांसमोर मृतदेहाची ओळख पटवण्याचं आवाहन होतं.

यवतमाळ : एका हायप्रोफाईल हत्येच्या घटनेने यवतमाळ जिल्हा हादरून गेला आहे. प्राध्यापक पतीचा वन विभागात वनरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पत्नीने हत्या केली आहे. सचिन देशमुख असं प्राध्यापक पतीचे नाव आहे. तर पतीची हत्या करणाऱ्या वनरक्षक महिलेचे नाव धनश्री देशमुख असं आहे. धनश्री देशमुख यांनी प्रियकराच्या साथीने पतीची प्राध्यापक पतीची हत्या केली आहे. अनैतिक संबंधातून सदर हत्या झाल्याचे उघड झाले आहे. सदर घटना यवतमाळ जिल्ह्यात सिंगद येथील पुलाखाली १ ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती. शवविच्छेदन अहवालात तरुणाचा खून झाल्याचे उघड झाल्यानंतर दिग्रस पोलिसांनी पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध हत्या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय.

अधिक वाचा ; ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदींना भेटून करणार महत्त्वाची मागणी

पत्नी व तिच्या प्रियकराचा सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राध्यापक असलेल्या पतीच्या हत्येत पत्नी व तिच्या प्रियकराचा सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांनी दिली आहे. सचिन देशमुख यांच्या चुलत भाऊ हर्षद नागोराव देशमुख यांना वैद्यकीय अहवालात काही बाबींवर संशय आला होता. यानंतर त्यांनी पोलिसात जाऊन घातपात झाल्याची तक्रार दिली होती. हर्षद नागोराव देशमुख यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी देखील हत्येचा संशय व्यक्त करत त्या दिशेने तपास सुरु केला होता.

अधिक वाचा ; Commonwealth Games 2022 : लॉन्ग जंपमध्ये श्रीशंकरनं पटकावलं

पोलिसांसमोर मृतदेहाची ओळख पटवण्याचं आवाहन होतं.

देशमुख उमरखेड येथील भाऊसाहेब माने कृषी विद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. सचिन देशमुख यांचा मृतदेह सोमवारी सिंगद येथील पुलाखाली सापडला होता. मात्र, सदर मृतदेह कोणाचा आहे. याची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आवाहन होते. यावेळी पोलिसांना मयत तरुणाच्या शरीरावर सचिन नाव गोंदलेलं आढळलं आणि तपासाला नवी दिशा मिळाली. गोंदलेल्या सचिन नावावरून पोलिसांनी हा मृतदेह उमरखेड येथील प्राध्यापक सचिन वसंतराव देशमुख यांचा असल्याचं निश्चित केलं. दरम्यान, सचिन वनरक्षक असलेल्या पत्नीला भेटायला अकोट येथे गले होते. त्यानंतर अचानक त्याचा मृतदेह आढळल्याने पोलिसांना घातपात झाल्याचा संशय आला होता.

अधिक वाचा ; न्यायमूर्ती उदय ललित होणार भारताचे 49 वे सरन्यायाधीश 

पोलीस तपासात अनैतिक संबंधातून गळा आवळून हा खून झाल्याचे समोर आले

वैद्यकीय अहवालात संशयित बाबी आढळून आल्याने दिग्रस पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी सचिन देशमुख यांच्या पत्नीची माहिती काढली असता वनरक्षक पत्नीचा प्रियकर शिवम चंदन बछले परतवाडा येथे वनरक्षकचं असल्याचं समोर आले. यानंतर पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली असता प्राथमिक चौकशीत सचिन यांची पत्नी आणि तिचा प्रियकर शिवम चंदन बछले यांच्या सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी