Rain Alert : विदर्भ मराठवाड्यासाठी अवकाळी पावसाचा अलर्ट

rain alert for Vidarbha Marathwada : जानेवारी २०२२ मध्ये अवकाळी पाऊस येईल. अवकाळीचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि मराठवाड्याला बसेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

rain alert for Vidarbha Marathwada
विदर्भ मराठवाड्यासाठी अवकाळी पावसाचा अलर्ट 
थोडं पण कामाचं
  • विदर्भ मराठवाड्यासाठी अवकाळी पावसाचा अलर्ट
  • जानेवारी २०२२ मध्ये अवकाळी पाऊस येईल
  • अवकाळीचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि मराठवाड्याला

rain alert for Vidarbha Marathwada : नागपूर : जानेवारी २०२२ मध्ये अवकाळी पाऊस येईल. अवकाळीचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि मराठवाड्याला बसेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याआधी डिसेंबर २०२१ मध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस पडला होता. या अवकाळीमुळे प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. आता पुन्हा एकदा त्यांनाच अवकाळीचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

उत्तरेकडील वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. राज्यात ६ ते १० जानेवारी २०२२ दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे; असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही भागांमध्ये ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडेल; असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भाच्या काही भागांना ९ जानेवारी २०२२ रोजी गारपिटीचा फटका बसण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अमरावती, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीसाठी हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुलडाणा, अकोला, वर्धा, अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांकरिता ८ जानेवारीसाठी यलो अलर्ट आहे.

  1. ६ जानेवारी २०२२ - धुळे, नंदुरबार
  2. ७ जानेवारी २०२२ - धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर
  3. ८ जानेवारी २०२२ - ठाणे पालघर व उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील काही भाग
  4. ९ जानेवारी २०२२ - मराठवाडा आणि विदर्भातील काही भाग

डिसेंबर २०२१ च्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे ४०० हेक्टर तर जालना जिल्ह्यात १९०० हेक्टरपेक्षा जास्त जागेतील पिकांना फटका बसला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी