Nagpur Rape Case: धक्कादायक! नोकरीचं आमिष दाखवून उच्चशिक्षित तरुणीवर बलात्कार

नागपूर
भरत जाधव
Updated Jul 06, 2022 | 08:02 IST

नागपूर शहर पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेनं (Nagpur Crime) हादरलं आहे. शहरातील पारडी भागात एका उच्चशिक्षित तरुणीवर बलात्कार (Rape) झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणी नोकरीच्या शोधात होती. तिला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Nagpur Rape Case
नोकरीचं आमिष दाखवून उच्चशिक्षित तरुणीवर बलात्कार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पीडित तरुणी 24 वर्षांची असून ती उच्चशिक्षित आहे.
  • या प्रकरणातील आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Nagpur Rape Case : नागपूर शहर पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेनं (Nagpur Crime) हादरलं आहे. शहरातील पारडी भागात एका उच्चशिक्षित तरुणीवर बलात्कार (Rape) झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणी नोकरीच्या शोधात होती. तिला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नीलेश योगेश्वर हेडाऊ (वय-40, रा. हसनबाग) असं नराधमाचे नाव आहे. 

या घटनेविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडित तरुणी 24 वर्षांची असून ती उच्चशिक्षित आहे. तिला आई नाही. वडील हे दिव्यांग आहेत. वडील आणि धाकट्या बहिणीसोबत ती अंबाझरी भागात राहते. घराची संपूर्ण जबाबदारी ही पीडितेच्या खांद्यावर आहे. धाकट्या बहिणीचे शिक्षण आणि घर चालवण्यासाठी ती नोकरी शोधत होती. दरम्यान, 28 जूनला रोजी ती मोरभवन बसस्टँडवर बसची वाट पाहत बसली होती. तिथे तिची आरोपी नीलेश हेडाऊ याच्याशी ओळख झाली. नीलेश याने स्वतःला हॉटेल व्यावसायिक असल्याचे सांगितले. इतकंच नाही तर पीडितेली हॉटेलमध्ये चांगल्या पगारावर नोकरी देण्याचेही आश्वासन दिले होते.

Read Also : CID पुन्हा सुरु होणार?, शिवाजी साटम यांनी दिले संकेत

मुलाखतीसाठी बोलावलं आणि पडक्या घरात नेलं मग.. 

ओळख झाल्यानंतर नीलेशने पीडितेला त्याचा मोबाईल नंबर दिला तसेच तिचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर त्याने 3 जुलैला पीडितेला फोन करून मुलाखतीला कोराडी परिसरातील एका हॉटेलमध्ये जाण्यास सांगितले. आरोपी पीडितेला घेण्यासाठी गणेशपेठ मध्यवर्ती बसस्टँडवर पोहोचला. नंतर दोघे दुचाकीने कोराडीकडे न जाता पारडी मार्गाने एका मंदिराजवळ आले. तिथे असलेल्या एका पडक्या घरात आरोपी ही पीडितेला घेवून गेला. तोपर्यंत अंधार झाला होता. नोकरी हवी असेल तर शारीरिक संबंध ठेवावे लागतील, ही अट घातली. पीडितेने त्याला नकार दिला. परंतु नराधमाने निर्मनुष्य भाग असल्याचा फायदा घेत पीडितेवर बलात्कार केला. दरम्यान या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नीलेश हेडाऊ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी