अमरावती : पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह यांना थेट निलंबित करून तुरूंगात टाकण्याची धमकी आमदार रवी राणा यांनी दिली आहे. राणा पती पत्नी आणि पोलीस विभागाचा वाद आता विकोपाला पोहचला आहे असचं म्हणावे लागेल. दरम्यान, आमदार रवी राणा यांनी आरती सिंह यांची पंतप्रधान, गृहमंत्री यांच्याकडे तक्रार करून ईडी, सीबीआय चौकशी करून तुरूंगात टाकणार असल्याची धमकी दिली आहे. पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी खोटे गुन्हे दाखल करण्याची सीमा ओलांडली असून आता सहन होणार नाही. असंही आमदार रवी राणा यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, खासदार नवनीत राणा यांनी हक्कभंग आणून पोलीस आयुक्तांची तक्रार दाखल केली त्यामुळे हा वाद कुठे जाऊन थांबेल हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच पण एक महिला अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
अधिक वाचा : वाचा मराठी नववर्षातील संपूर्ण राशीभविष्य
दरम्यान, पुढे बोलताना रवी राणा यांनी म्हटलं आहे की, या आधी त्यांनी ज्या-ज्या ठिकाणी काम केलंय त्या-त्या ठिकाणीही असाच भ्रष्टाचार केला आहे. माझ्यावर आणि माझ्या कार्यकर्त्यांवर जो गुन्हा दाखल करायचा आहे तो दाखल करा, त्याला उत्तर मी देईन. "अमरावतीमध्ये आरती सिंह यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून, पैसे घेऊन त्या गुन्हेगारांशी सेटलमेंट करत असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे. दरम्याHeading 3न, कालच खासदार नवनीत राणा यांच्या तक्रारीवरून पोलीस आयुक्तांना नवी दिल्ली येथे ६ एप्रिलला हजर राहण्याचे आदेश मिळाले आणि रात्री आमदार रवी राणा यांच्या पार्टीच्या शहर अध्यक्षाला अटक झाल्याने शहरात उलट – सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
अधिक वाचा : तरुणीने माध्यमांसमोर येऊन शिवसेनेच्या नेत्यावर केले गंभीर आर
काल रात्री मनपा आयुक्त यांच्यावर शाइफेक प्रकरणी युवा स्वाभिमान पार्टीचे अध्यक्ष संजय हिंगासपुरे यांना अटक आहे. तर, "काही दिवसांपूर्वी अमरावती शहरातीलदिल्ली पब्लिक स्कुलच्या प्राचार्यांनी दोन लहान मुलांचे कॅबिनमध्ये केसं कापले आणि एका ६ वर्षीय मुलाला बॅड टच केलं अशी तक्रार पालकानी दिली आणि पोलीसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्या प्राचार्याला अटक केली. दरम्यान, पुढे बोलताना रवी राणा यांनी म्हटलं की, अमरावती जिल्ह्यामध्ये जो काही भ्रष्टाचार सुरू आहे, त्या विरोधात मी पंतप्रधान, गृहमंत्री सर्वोच्च न्यायालय तसेच ईडी किंवा सीबीआयकडे जाईन पण आरती सिंह यांना तुरुंगात टाकणारच. असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.
अधिक वाचा : हेलिकॉप्टरद्वारे अष्टविनायक दर्शन