तर मातोश्रीवर परत जाऊ, बंडखोर राठोड यवतमाळमध्ये पोहचल्यावर खळबळ विधान

Rebel MLA Sanjay Rathore's shocking statement : आमदार राठोड हे पहिल्यांदाच  यवतमाळला आल्यानंतर त्यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. आमदार राठोड म्हणाले की, मातोश्री’चे दरवाजे सन्मानाने आमच्यासाठी उघडले तर आम्ही सर्वजण परत जाऊ, असं राठोड म्हणाले राठोड यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.

Rebel MLA Sanjay Rathore's shocking statement
तर तर मातोश्रीवर परत जाऊ बंडखोर आमदार संजय राठोडांच वक्तव्य   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मातोश्री’चे दरवाजे सन्मानाने आमच्यासाठी उघडले तर आम्ही सर्वजण परत जाऊ - संजय राठोड
  • शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही ४० आमदारांनी घेतलेली भूमिका बंड नव्हे तर उठाव - आमदार संजय राठोड
  • आम्ही आजही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच शिवसैनिक आहोत – आमदार राठोड

यवतमाळ : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड करत अनेक आमदार आपल्या गटात घेतले घेतले आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेला बंड यशस्वी देखील झाला आहे. शिंदे यांनी केलेल्या बंडात शिवसेनेचे अनेक मंत्री आणि आमदार देखील सहभागी झाले होते. दरम्यान, बंड केलेले आमदार महाराष्ट्रात २ दिवसांपूर्वीच परतले असून, बहुमत चाचणीनंतर ते आपल्या मतदारसंघात मुंबईहून परतत आहेत. या आमदारांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांचा देखील सहभाग आहे.

अधिक वाचा : सरवणकरांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानं सेनेच्या गोटात खळबळ

शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही ४० आमदारांनी घेतलेली भूमिका बंड नव्हे तर उठाव

आमदार राठोड हे पहिल्यांदाच  यवतमाळला आल्यानंतर त्यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. आमदार राठोड म्हणाले की, मातोश्री’चे दरवाजे सन्मानाने आमच्यासाठी उघडले तर आम्ही सर्वजण परत जाऊ, असं राठोड म्हणाले, या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. त्याचबरोबर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही ४० आमदारांनी घेतलेली भूमिका बंड नव्हे तर उठाव होता. असंही आमदार राठोड म्हणाले.

अधिक वाचा : अभिमन्यूची जीवन-मरणाची लढाई, अक्षराला बसेल मोठा धक्का

आम्ही आजही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच शिवसैनिक आहोत – आमदार राठोड

शिवसेनेत बंड करून शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर येथील दिग्रसचे आमदार संजय राठोड यांचे आज प्रथमच यवतमाळ येथे आगमन झाले आहे. यावेळी बोलताना राठोड यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. दरम्यान, राठोड यांनी संजय राऊत यांच्यावर देखील नाव न घेता टीकास्त्र सोडले आहे. पक्षातील उठावानंतर सर्वांचाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘मातोश्री’वर परत येण्याचा विचार सुरू असताना, काही व्यक्तींच्या अनावश्यक बडबडीमुळे ते शक्य झाले नाही, असं राठोड म्हणाले. “आम्ही आजही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच शिवसैनिक आहोत. मात्र मविआत शिवसेनेवर कायम अन्याय झाला असल्याचं राठोड यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा : घोड्यावरून डिलिव्हरी करणाऱ्या ‘पार्टनर’चा स्विगी घेतेय शोध 

तत्वासाठी आणि लोकहिताची कामे करण्यासाठी आम्हाला बाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता – आमदार संजय राठोड

पुढे बोलताना राठोड म्हणाले की, आत्मसन्मानार्थ आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्वासाठी व लोकहिताची कामे करण्यासाठी आम्हाला बाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता. असं वक्तव्य राठोड यांनी केले आहे. शिंदे गटात गेलेल्या अनेक मंत्री, आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेतील व पक्षातील गळचेपीबद्दल वारंवार सांगूनही आमच्या समस्यांकडे कोणी लक्ष दिले नाही. त्यामुळे, असंही राठोड म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी