नागपूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून कर्नाटक सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. मराष्ट्रातील गावे कर्नाटकात जोडण्याची मागणी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केली होती. यावर महाराष्ट्र सरकार थोडी नरमाईची भूमिका घेत होते. आज हिवाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारने आक्रमक भूमिका घेत कर्नाटक सीमाप्रश्न ठराव मंजूर केला आहे. (resolution approved on karnataka- maharashtra border)
कर्नाटकातील मराठी भाषिक असलेल्या 865 गावातील इंच इंच जागा महाराष्टात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जाईल, असा ठराव मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मांडण्यात आला. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात ठरावाचे वाचन केले. सीमाप्रश्नावरून कर्नाटक सरकारने विधिमंडळात केलेल्या ठरावाला जशास तसे उत्तर देणारा ठराव विधिमंडळात मंजूर करण्याची घोषणा सरकारने केली होती. दरम्यान, या ठरावाअगोदर उद्धव ठाकरे यांनी केलेली मागणी नाकारण्यात आली आहे. सविस्तर वृत्त थोड्यात वेळात..