rss chief mohan bhagwat statement on women empowerment in nagpur : महिलांसाठी सुरू असलेल्या कामाची गती वाढविणे आवश्यक आहे असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ५० टक्के लोकसंख्या ही महिलांची आहे. यामुळे देशाच्या विकासात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.
भारतात महिलांना ३० टक्के आरक्षण असावे की असू नये यावर अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. चर्चा व्हायला हवी पण किती काळ हे पण विचारात घ्यायला हवे. वेग वाढविण्याची गरज आहे, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.
अलिकडेच महिलांशी संबंधित एक सर्वेक्षण झाले. या सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीचा उपयोग सरकारी पातळीवर संदर्भ म्हणून केला जात आहे. सर्वेक्षणातून प्रचंड माहिती उपलब्ध झाली. देशात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. या नारीशक्तीचा वापर सुयोग्य पद्धतीने झाला तर देशाच्या विकासाला आणखी गती मिळेल. या दृष्टीने नियोजन होणे आवश्यक आहे; असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.