Sharad Pawar: 'शिंदे-फडणवीसांची राज्य चालवण्याची कुवत काय आहे हे राऊतांना माहिती आहे', नागपुरातून पवारांचा खोचक पुणेरी टोला

नागपूर
रोहित गोळे
Updated Jul 15, 2022 | 23:44 IST

Sharad Pawar Taunt: 'शिंदे-फडणवीसांची राज्य चालवण्याची कुवत काय आहे हे राऊतांना माहिती आहे', असा खास खोचक पुणेरी टोला शरद पवार यांनी आपल्या नागपूरमधील पत्रकार परिषदेतून लगावला आहे.

sanjay raut knows what is power of eknath shinde devendra fadnavis to run  state sharad pawar taunt nagpur
'शिंदे-फडणवीसांची राज्य चालवण्याची कुवत राऊतांना माहितीए' 
थोडं पण कामाचं
  • शरद पवारांचा शिंदे-फडणवीसांना खोचक टोला
  • शरद पवार यांचा नागपूर दौरा
  • मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावरही शरद पवारांनी केली टीका

नागपूर: सध्या सरकार हे शिंदे नाही तर उपमुख्यमंत्री फडणवीस हेच चालवत आहेत. या संजय राऊतांच्या (Sanjay Raut) वक्तव्याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी खास आपल्या पुणेरी शैलीत शिंदे-फडणवीसांना खोचक टोमणा मारला आहे.

शरद पवार हे सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. याचवेळी शरद पवार यांनी येथे पत्रकार परिषद देखील घेतली. ज्यावेळी त्यांना संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांचं मत विचारण्यात आलं. तेव्हा पवार मिश्किलपणे म्हणाले की, राऊतांसारख्या ज्ञानी माणसाने मत व्यक्त केलं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

अधिक वाचा: फडणवीस सतत अपमान करतात मुख्यमंत्र्यांचा: सुप्रिया सुळे

'राऊतांना शिंदे-फडणवीसांची राज्य चालवण्याची कुवत माहिती आहे'

'असं आहे की, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या दोघांसोबत काम करायची संधी ही राऊत साहेबांना यापूर्वी आली होती. त्यांचे हे सगळे सहकारी होते. त्यामुळे त्या सगळ्यांची राज्य चालविण्याची कुवत काय आहे या सगळ्या गोष्टीचा आम्हा सगळ्या लोकांपेक्षा त्यांना अधिक ज्ञान त्यांना आहे. कारण ते एका पक्षात होते. त्यामुळे अशा ज्ञानी लोकांचं मत एकदम दुर्लक्ष करावं असं मला वाटत नाही.' असा टोला शरद पवारांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना दोघांनाही हाणला.

'देशाची अर्थव्यवस्था हीच मुळी संकटात आली आहे'

'देशाची अर्थव्यवस्था हीच मुळी संकटात आली आहे. केंद्रातील सरकारचं हेच काम असतं की, देशातील अर्थव्यवस्था नीट कशी राहील. त्या दृष्टीने योग्य दिशेने पावलं टाकली नाही ही जी आमची तक्रार होती ती तक्रार आता रुपयाचं अवमूल्यन ज्या पद्धतीने होतंय त्यावरुन आमची तक्रार योग्य होती हे आता दिसून येतं आहे.' दरम्यान, याच पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करत चिंता व्यक्त केली. 

अधिक वाचा: मनसेच्या एकमेव आमदाराला मिळणार मंत्रिपद?

शिंदे-फडणवीसांवर संजय राऊतांनी नेमकी काय टीका केली होती?

'मुळात हे सरकार बेकायदेशीर आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे. या सरकारला हे निर्णय फिरविण्याचा अजिबात अधिकार नाही. कारण या सरकारबाबतचा निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालयात व्हायचा आहे.' 

'या निर्णयाने काय साध्य केलं हा प्रश्न तुम्ही उपमुख्यमंत्री फडणवीस यांना विचारायला हवा. मुख्यमंत्र्यांना विचारला जावा असं मी म्हणणार नाही. कारण त्यांच्या हातात काहीच नाही.' अशी टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर केली होती. 

अधिक वाचा: महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री कोण... शिंदे की फडणवीस?

'कधी चिठ्ठ्या पाठवतात, कधी माईक खेचतात, कधी शर्ट खेचतात, बऱ्याच गंमती-जमती महाराष्ट्रात सध्या पाहायला मिळत आहे. त्यावर मी काय बोलणार. खरे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच आहेत.' असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी