SEX करण्यास नकार दिल्याने संतप्त पतीचा पत्नीवर बॅटने हल्ला

नागपूर
Updated Sep 11, 2019 | 22:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Wife refuse sex to husband: आपल्या पत्नीने शारीरिक संबंधास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने पत्नीवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना नागपूर शहरात घडली आहे.

Wife refused for sex, angry husband attacked on her in Nagpur
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • सेक्स करण्यास नकार दिल्याने पती संतापला
  • रागाच्या भरात पतीने केला पत्नीवर हल्ला
  • रात्रीच्या सुमारास पतीने पत्नीवर केला बॅटने हल्ला
  • आरोपी पतीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

नागपूर: पती आणि पत्नी यांच्यात भांडण होतच असतात. मात्र, नागपुरात एक विचित्र आणि धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. आपल्या पत्नीने संभोग करण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने पत्नीवर हल्ला केला आहे. नागपूर शहरातील प्रेमनगर, नारायणपेठ येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील प्रेमनगर, नारायणपेठ येथे ४५ वर्षीय आरोपी आपल्या पत्नीसह राहतो. मंगळवारी रात्रीच्या सुमारास आरोपी पतीने आपल्या पत्नीकडे संभोगाची मागणी केली. मात्र, त्याच्या पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने तिचा पती चांगलाच संतापला आणि त्यानंतर त्याने तिच्यावर हल्ला केला. 

आरोपी पतीने आपल्या पत्नीवर लाकजी बॅटने डाव्या हाताच्या मनगटावर हल्ला केला. पतीने केलेल्या या हल्ल्यात पत्नीच्या हाताला दुखापत झाली आणि हात फ्रॅक्चर झाला. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली. या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडित महिलेने या घटनेप्रकरणी आपल्या पतीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. 

पीडित महिलेने आपल्या पतीविरुद्ध शांतीनगर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आऱोपीविरुद्ध कलम ३२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी नागपूर पोलीस अधिक तपास करत आहेत. तर, पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शाळेच्या आवारात शिक्षकाचा सेक्स 

तर तिकडे एका शिक्षकाने शाळेच्या आवारात सेक्स केल्याचा धक्कादायक प्रकार तमिळनाडूमध्ये उघडकीस आला आहे. आरोपी शिक्षक हा अंगणवाडी सेविकेसोबत शाळेच्या आवारातच सेक्स करत होता. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोघांनाही रंगेहात पकडलं. शिक्षकाचं हे कृत्य पाहून संतापलेल्या ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाला बेदम चोप दिला. या घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच शाळा व्यवस्थापनाकडून आरोपी शिक्षकावर कारवाई करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...