Sudhir Mungantiwar | शरद पवारांनी नव्वदच्या दशकापासून सातत्याने आपल्या भूमिका बदलल्या - सुधीर मुनगंटीवार

  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना हिंदुत्वाबद्दल ऍलर्जी आहे काय हे माहीत नाही. त्यांनी राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल स्पष्टता करावी असे सांगत नव्वदच्या दशकापासून शरद पवार सातत्याने सोयीनुसार भूमिका बदलतात अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नोंदविली आहे.

Sharad Pawar has changed his role continuously since the nineties - Sudhir Mungantiwar
पवारांनीही भूमिका बदलल्या - मुनगंटीवार  
थोडं पण कामाचं
  •   राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना हिंदुत्वाबद्दल ऍलर्जी आहे काय हे माहीत नाही.
  • त्यांनी राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल स्पष्टता करावी
  • नव्वदच्या दशकापासून शरद पवार सातत्याने सोयीनुसार भूमिका बदलतात अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नोंदविली आहे.

चंद्रपूर :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना हिंदुत्वाबद्दल ऍलर्जी आहे काय हे माहीत नाही. त्यांनी राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल स्पष्टता करावी असे सांगत नव्वदच्या दशकापासून शरद पवार सातत्याने सोयीनुसार भूमिका बदलतात अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नोंदविली आहे.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याविषयीची त्यांची भूमिका आठवून बघा असे सांगत पवार यांच्या भूमिका भरती-ओहोटी प्रमाणे बदलत असतात अशी टीका केली. उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी धूर्तपणाने वागणार असे सांगणे म्हणजे स्वतःचा स्वभाव सांगितल्याची भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची टीका काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण भाजपशी धूर्तपणाने वागणार असे विधान केले. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करून स्वतःचा स्वभाव सांगितला असल्याचे मत व्यक्त केले. यावर अधिक भाष्य नको असेही ते म्हणाले.

दिलीप वळसे पाटील हे सज्जन व्यक्ती आहेत. पण आता त्यांचा मेंदू राजकीय झाला आहे. उस्मानीवर काय कारवाई झाली, हे अजून कळलेले नाही. मंत्रालयात हजारो दारूच्या बाटल्या सापडल्या. कोण याचा सूत्रधार होता, कोण दारूच्या बाटल्या देऊन फाईलींवर सह्या घ्यायचा, हेही कळले नाही. त्यांना भीमाशंकर सद्बुद्धी देवो, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

बाबरी मशीद पडल्यानंतर ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यात शिवसैनिक किती होते, याची माहिती संजय राऊत यांनी जाहीर करावी, असे प्रति आव्हान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. एफआयआर दाखल झालेल्या यादीत एकतरी शिवसैनिक दाखवून द्यावा. तेव्हा आम्ही मानू की राऊत सत्य बोलत आहेत. मी असो, भंडारी असोत किंवा खुद्द राऊत असोत, कोण काय बोलतो, हे महत्वाचे नाही. एफआयआरमध्ये शिवसैनिकांची नावे राऊत यांनी दाखवावी किंवा एफआयआर जेव्हा दाखल होत होता, तेव्हा धुर्तपणे  काँग्रेसची माफी मागून आपली नावे एफआयआरमधून काढली का, ते स्पष्ट करावे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी