Shiv Sena Dussehra Melava: दसरा मेळावा शिंदे गटाकडून हायजॅक? मेळाव्याच्या परवानगीबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Shiv Sena Dasara Melava: शिवसेनेच्या दसरा मेळाव्या वरुन आता ठाकरे विरुद्ध शिंदे असा संघर्ष होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

Shiv Sena Dussehra Melava 2022 dycm devendra fadnavis reaction on permission of dasara melava read in marathi
Shiv Sena Dussehra Melava: दसरा मेळावा शिंदे गटाकडून हायजॅक? मेळाव्याच्या परवानगीबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले... 
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेचा दसरा मेळावा शिंदे गट हायजॅक करणार?
  • दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेकडून अर्ज, मात्र अद्याप परवानगी नाही
  • शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळणार की नाही?

Devendra Fadnavis reaction on Shiv Sena Dussehra Melava: शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी भाजपसोबत मिळून राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिंदे गटाने आपण शिवसेनेतच असून पक्षावरही दावा केला आहे. यावरुन ठाकरे विरुद्ध शिंदे असा संघर्ष सुरू असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या शिवाजी पार्कात होणाऱ्या दसरा मेळाव्यावरुन आता ठाकरे विरुद्ध शिंदे असा नवा अंक रंगण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. कारण, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी सेनेकडून अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र, यावर मुंबई मनपाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये. (Shiv Sena Dussehra Melava 2022 dycm devendra fadnavis reaction on permission of dasara melava read in marathi)

मुंबई मनपाकडून अद्याप परवानगी दिलेली नसताना आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान केलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, जे नियमात आहे ते होईल. नियमाच्या बाहेर जाऊन या सरकारमध्ये काहीच होणार नाही. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत त्यामुळे त्यांचा निर्णय काय आहे हे मला माहिती नाही. ते दसरा मेळावा घेणार आहेत की नाही याची मला कल्पना नाही. उद्धव ठाकरे दसरा मेळावा घेणार आहेत की नाही याचीही मला कल्पना नाहीये. गृहमंत्री म्हणून इतकेच सांगू शकतो की जे नियमात असेल ते आम्ही करू.

हे पण वाचा : वयाच्या 13व्या वर्षी करिना 'याच्या' प्रेमात झाली होती वेडी

शिवसेना आणि दसरा मेळावा हे एक वेगळेच नाते आहे. दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानावर दरवर्षी होत असतो. या मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपलं परखड मत या भाषणातून मांडत असत. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे हे दसरा मेळावा घेत आहेत. दसरा मेळाव्यात विचारांचे सोने लुटण्यासाठी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक शिवाजी पार्कात येत असतात. सध्या शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावरुन उद्धव ठाकरे हे दसरा मेळाव्यात नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांच्या नजरा होत्या पण आता शिंदे गट दसरा मेळावा हायजॅक करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिवाजी पार्कात दसरा मेळावा घ्यावा यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज सादर करण्यात येतो. त्यानंतर मनपाकडून त्याला परवानगी देण्यात येते. त्यानुसार, यंदाही आपला अर्ज सादर केला आहे. मात्र, शिवसेनेने मुंबई मनपाच्या जी उत्तर विभागाकडून अर्जावर कोणताही भूमिका जाहीर केलेली नाहीये. त्यानंतर काल पुन्हा एकदा शिवसेनेकडून मुंबई मनपा आयुक्तांकडे अर्ज दाखल करण्यात आला. मात्र, मनपा आयुक्त इक्बालसिंह चह यांच्याकडूनही यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये. यामुळेच आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी