राणा कुटुंबाने मातोश्री बाहेर जाऊनच दाखवावे, चांगलाच पाहुणचार घेतल्याशिवाय सोडणार नाही, शिवसेनेच्या आमदाराने दिला इशारा

Shiv Sena MLA Sanjay Gaikwad gave a warning to MLA Ravi Rana : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील वांद्रे इथला 'मातोश्री' निवासस्थाना बाहेर येऊन २३ एप्रिल रोजी हनुमान चालीसाचे पठण करण्याचा निर्धार आमदार रवी राणा यांनी यांनी केला आहे. मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालीसाचं वाचन करणार असल्याने पोलिसांनी पूर्ण काळजी घेत मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

Shiv Sena MLA Sanjay Gaikwad gave a warning to MLA Ravi Rana
राणा कुटुंबाने मातोश्री बाहेर जाऊनच दाखवावे पाहूणचार घेणार   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  •  'अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा कुटुंब हे नौटंकी करत आहे - आमदार संजय गायकवाड
  • रवी राणा यांचा 'मातोश्री' निवासस्थाना बाहेर येऊन २३ एप्रिल रोजी हनुमान चालीसाचे पठण करण्याचा निर्धार
  • भारतीय जनता पार्टीने या राज्यात असे बरेच भूंकणारे कुत्रे सोडलेले आहेत – आमदार संजय गायकवाड

बुलडाणा : 'अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा कुटुंब हे नौटंकी करत असून, रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीवर जाऊनच दाखवावे, त्यांचा चांगलाच पाहुणचार घेतल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे. संजय गायकवाड यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे राणा कुटुंब मातोश्रीवर जाते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा : IPL: CSKच्या खेळाडूची धोकादायक बॉलिंग, तोंडावर पडला इशान

आमदार रवी राणा यांनी दिला होता इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील वांद्रे इथला 'मातोश्री' निवासस्थाना बाहेर येऊन २३ एप्रिल रोजी हनुमान चालीसाचे पठण करण्याचा निर्धार आमदार रवी राणा यांनी यांनी केला आहे. मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालीसाचं वाचन करणार असल्याने पोलिसांनी पूर्ण काळजी घेत मोठा फौजफाटा तैनात केला आहे. दरम्यान, राणासोबत शेकडो कार्यकर्ते देखील येणार असल्याचं यांनी म्हटलं होत. त्यामुळे, मुंबई पोलिसांनी मध्यरात्री मातोश्रीच्या समोरील रस्त्यावर दोन्ही बाजूंनी बॅरिकेडिंग केली आहे. 

अधिक वाचा : कामगारांच्या हिताला बाधा येऊ दिली जाणार नाही - हसन मुश्रीफ 

भारतीय जनता पार्टीने या राज्यात असे बरेच भूकणारे कुत्रे सोडलेले आहेत – आमदार संजय गायकवाड

दरम्यान, पुढे बोलताना संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे की, पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मातोश्रीवर जाण्याची भाषा केली होती ते कधीच तिथे पोहोचू शकले नाहीत तर हे टपरु राणा कुटुंब कसे पोहचतील. 'मातोश्री'ला शिवसैनिकाचं सुरक्षेचं कवच कुंडले आहे की कोणीही तिथे पोहोचू शकणार नाही. हे जातील तर चांगला पाहूणचार करण्यात येईल' असा इशाराच संजय गायकवाड यांनी दिला आहे. राणा कुटुंब निवडून आले राष्ट्रवादीच्या भरवश्यावर आता चमचेगिरी करत आहे  भाजपची. असे भारतीय जनता पार्टीने या राज्यात असे बरेच भूकणारे कुत्रे सोडलेले आहेत, जसे राज ठाकरे, नारायण राणे, किरीट सॊमय्या व आता हे राणा कुटुंब हे सर्व ते आहेत, अशी विखारी टीका संजय गायकवाड यांनी केली. त्यामुळे हे सर्व काही नौटंकी करत असून प्रसिद्धीसाठी नाटक करीत आहेत. याकडे कोणीही लक्ष देऊ नये असंही गायकवाड यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा ; IPL: कोण आहे रितीक शौकीन? मुंबई इंडियन्ससाठी उतरला मैदानात

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी