Rana vs Shiv Sena ।  राणाविरुद्ध शिवसेना वाद पेटला; अमरावतीत शिवसेना भवनाची आत घुसून तोडफोड

युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अमरावती येथील शिवसेना भवनासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद साजरा केला. त्यानंतर आमदार राणांच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेना भवनाची तोडफोड केली. 

Shiv Sena vs Rana Breaking into Shiv Sena Bhavan in Amravati
अमरावतीत शिवसेना भवनाची आत घुसून तोडफोड  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हनुमान चालीसा वादावरून काही दिवसांपूर्वी राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला होता.
  • याचवेळी राणा समर्थकांनी शिवसेनेला निशाणा बनवला.
  • अमरावतील राजापेठ येथे असणाऱ्या शिवसेना भवनात आत घुसून राणा समर्थकांनी खुर्च्यांची तोडफोड केली.

अमरावती :  युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात राणा दाम्पत्याला जामीन मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. मात्र याचवेळी राणा समर्थकांनी शिवसेनेला निशाणा बनवला. अमरावतील राजापेठ येथे असणाऱ्या शिवसेना भवनात आत घुसून राणा समर्थकांनी खुर्च्यांची तोडफोड केली. युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अमरावती येथील शिवसेना भवनासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद साजरा केला. त्यानंतर आमदार राणांच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेना भवनाची तोडफोड केली. 

 हनुमान चालीसा वादावरून काही दिवसांपूर्वी राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला होता. मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करू असं आव्हान आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेला दिले होते. मात्र राणा दाम्पत्याच्या आव्हानानंतर शिवसैनिकांनी संतप्त भूमिका घेत राणा दाम्पत्याच्या घराबाहेर आंदोलन केले. (Shiv Sena vs Rana Breaking into Shiv Sena Bhavan in Amravati)

अधिक वाचा : राणा दाम्पत्याला करावं लागणार 'या' पाच अटींचं पालन

अमरावती तसेच मुंबईतील खार निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. हनुमान चालीसा पठण करणार असा ठासून सांगणाऱ्या राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिक २ दिवस रस्त्यांवर उतरले होते. काहींनी मातोश्रीबाहेर ठाण मांडलं होते. राणा दाम्पत्याविरोधात पोलिसांनी कारवाई करत राजद्रोहाचा खटला भरला. त्यानंतर अखेर १४ दिवसांनी राणा दाम्पत्याला कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर अमरावतीत मोठा जल्लोष करण्यात आला.

अधिक वाचा : निवडणुका जाहीर होणार, वाझेचे वारे जोरात वाहणार

 
 यावेळी घटनास्थळी पेट्रोल बॉटल आढळली. या घटनेनंतर तात्काळ पोलिसांनी ४ हल्लेखोरांना ताब्यात घेतलं असून शहरात तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी