शिवसेना शहरप्रमुखाच्या हत्येचा काही तासातच उलगडा

अमरावती जिल्ह्यातील तिवसाचे शिवसेना शहरप्रमुख अमोल पाटील यांच्या हत्येच्या प्रकरणात अवघ्या काही तासांमध्ये मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली.

Shivasena city chief amol patil murder case
शिवसेना शहरप्रमुखाच्या हत्येचा काही तासातच उलगडा   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • अमोल पाटील दारु पिण्यासाठी तिवसा येथील एका वाईन शॉपमध्ये गेला होता.
  • अमोल पाटील याची जुन्या वादातून डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या
  • आरोपींनी अमोल पाटील याच्या हत्येचा आधीच कट रचला होता.

अमरावती : शिवसेनेच्या शहरप्रमुखाची निघृणपणे हत्या झाली होती. हत्या झालेल्या शिवसेना शहरप्रमुखाचे नांव अमोल पाटील असं होतं. अमोल पाटील हे तिवसाचे शहरप्रमुखाच होते. त्यांची काल रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हत्या झाली होती. शिवसेना शहरप्रमुखाच्या हत्येच्या घटनेमुळे अमरावतीत एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

अमोल पाटील दारु पिण्यासाठी तिवसा येथील एका वाईन शॉपमध्ये गेला होता. 

अमोल पाटील तिवसा येथील एका वाईन शॉपमध्ये दारू पिण्यासाठी गेला होता. यावेळी हल्लेखोरांनी अमोल पाटील यांच्यावर हल्ला चढवला. यामध्ये अमोल पाटील याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी घटनेच्या अवघ्या काही तासात चार जणांना अटक केली आहे.

अमोल पाटील याची जुन्या वादातून डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या

शिवसेनेचा तिवसा शहर प्रमुख अमोल पाटील याची जुन्या वादातून डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या केल्याची घटना घडली होती. अमोल पाटील याच्यावर यापूर्वी दोन हत्या केल्याचा आरोप होता. तसेच दीड महिन्यांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्याबाहेर तडीपाराचा आदेश देखील काढला होता. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तिवसा बसस्थानक जवळ आशीर्वाद वाईन शॉपसमोर काल रात्री अमोल पाटील यांच्या हत्येची घटना घडली. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. तर एक आरोपी पसार झाला आहे 

आरोपींनी अमोल पाटील याच्या हत्येचा आधीच कट रचला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री अमोल पाटील हा आपल्या एका मित्रांसोबत दारू पिण्यासाठी आशीर्वाद बारमध्ये आला होता. पण आरोपींनी अमोल पाटील याच्या हत्येचा आधीच कट रचला होता. आरोपींनी अमोलच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला जागीच ठार केले. 

आरोपींना वर्धा जिल्ह्यातील तळेगाव श्यामजीपंत येथून अटक करण्यात आली. 

मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला. पोलिसांनी घटनास्थळावर मिळालेल्या काही माहिती आणि पुराव्यांच्या आधारावर तपासाची चक्र फिरवली आणि अवघ्या काही तासातच चार आरोपींना वर्धा जिल्ह्यातील तळेगाव श्यामजीपंत येथून अटक करण्यात आली. प्रकरणातील आरोपी सुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. अजूनही एक आरोपी पसार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रिता उईके यांनी दिली आहे. या या घटनेनंतर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी