धक्कादायक ! दारू पाजून मूकबधीर ६५ वर्षीय आजीवर सामूहिक बलात्कार

Shocking! 65-year-old dumb and deaf grandmother gang-raped after drinking alcohol : सदर महिला पातूर तालुक्यातील सावरगाव येथील रहिवासी आहे. त्याचबरोबर पीडित महिलेचे वय ६५ वर्षीय असून, ती मूकबधीर देखील आहे. आरोपी नराधमांनी १७ जुलैला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बलात्कार केला आहे.

Shocking! 65-year-old dumb and deaf grandmother gang-raped after drinking alcohol
धक्कादायक ! दारू पाजून मूकबधीर ६५ वर्षीय आजीवर सामूहिक बलात्कार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दारू पाजून मूकबधीर ६५ वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार
  • १७ जुलैला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली घटना
  • न्यायालयाने त्यांना २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनवाली आहे

Shocking! 65-year-old dumb and deaf grandmother gang-raped after drinking alcohol : अकोला : मूकबधीर ६५ वर्षीय महिलेला दारु पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यात घडली आहे. दोन जणांनी पीडित महिलला दारू पाजून बलात्कार केल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चान्नी पोलिसांनी सदर घटनेची दखल घेत दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करत अटक देखील केली आहे. चान्नी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक गणेश महाजन अधिक करत आहेत.

१७ जुलैला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली घटना

मिळालेल्या माहतीनुसार, सदर महिला पातूर तालुक्यातील सावरगाव येथील रहिवासी आहे. त्याचबरोबर पीडित महिलेचे वय ६५ वर्षीय असून, ती मूकबधीर देखील आहे. आरोपी नराधमांनी १७ जुलैला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बलात्कार केला आहे. बलात्कार करणाऱ्या आरोपींची नावे विनोद लठाड आणि निलेश बोरकर अशी आहेत. महिलेने दिलेले फिर्यादीवरून विनोद आणि निलेश यांनी महिलेला दुचाकी वाहनावर बसवून नेले. त्यानंतर तिला धमकावून बळजबरीने दारु पाजली. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर तिला रात्री साडे नऊ वाजता सोडून दिले.

पीडित महिलेने सदर घडलेला प्रकार आपल्या महीले नातेवाईकांना सांगितला

आरोपींनी महिलेला सोडून दिल्यानंतर महिला घरी आली त्यानंतर १ दिवसांनी महिलेला त्रास सुरू झाला. आणि महिलेने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार कुटुंबातील मंडळींना सांगितला. हे एकूण कुटुंबाच्या सदस्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर कुटुंबातील नातेवाईकांनी पीडित महिलेला घेवून तात्काळ चान्नी पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील घटनेची दखल घेत तत्काळ आरोपींवर गुन्हा दाखल केला. तसंच आरोपींना देखील केलं आहे. 

न्यायालयाने त्यांना २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनवाली आहे

पोलिसांनी आरोपींना काही तासातच जाड केलं असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी विनोद आणि निलेश यांना २२ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर घटनेचा तपास पोलीस करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी