जवानाच्या पत्नीने उचलले धक्कादायक पाऊल , चिट्ठीत लिहून ठेवलं होत असं काही

Soldier's wife commits suicide : केंद्रीय राखीव पोलिस दलात कार्यरत असलेल्या जवानाच्या पत्नीने मुलांचा सांभाळ कर अशी चिठ्ठी आईला उद्देशून लिहून ठेवली आणि गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.

Soldier's wife commits suicide
जवानाच्या पत्नीने उचलले धक्कादायक पाऊल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पूनम यांनी पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला.
  •  'आई, तू माझ्या मुलांचा सांभाळ कर' अशा आशयाची चिट्ठी लिहून ठेवली
  • ही हृदयद्रावक घटना शिवणगावमधील सीआरपीएफ कॅम्प येथे घडली

नागपूर : केंद्रीय राखीव पोलिस दलात कार्यरत असलेल्या जवानाच्या पत्नीने मुलांचा सांभाळ कर अशी चिठ्ठी आईला उद्देशून लिहून ठेवली आणि गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना शिवणगावमधील सीआरपीएफ कॅम्प येथे घडली. पूनम राजकुमार डगवार (वय ३१), असे आत्महत्या करणाऱ्या जवानाच्या पत्नीचे नाव आहे.

पूनम यांनी पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला

दरम्यान, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर जवानाचे नाव हे राजकुमार असं आहे. राजकुमार हे झारखंडमधील रांची येथे तैनात आहेत. राजकुमार यांच्या सोबत त्यांच्या पत्नी पूनम या दोन मुलांसह सीआरपीएफ कॅम्पमध्ये राहायची. २७ डिसेंबरला राजकुमार हे घरी आले. यावेळी त्यांचा पूनम यांच्यासोबत वाद झाला. राजकुमार रांचीला परतले. मंगळवारी दुपारी पूनम यांनी पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. 

आत्महत्या करण्यापूर्वी पत्नीने चिट्ठीत नेमकं काय लिहून ठेवलं होते?

'माझ्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही, आई तू माझ्या मुलांचा सांभाळ कर', असे चिठ्ठीत लिहिले आहे. सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. जवानाच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटनेची माहिती मिळताच सोनेगाव पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी पूनम यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त केली.

उस्मानाबदमध्ये भीषण अपघात 

उस्मानाबाद जवळील आळणी येथे हा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात जे चार जण जागीच ठार झाले आहेत. ते चारही जण एकाच घरातील आहेत. सदर अपघातात कंटेनर आणि चारचाकी गाडीची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की चारचाकी गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघातग्रस्त गाडी एमएच २४ ए ए ८०५५ या चारचाकी गाडीतील ४ जण ठार झाले आहेत. सदर गाडी लातूर जिल्ह्यातील येथील आहे. पोलीस घटनास्थळी दाखलं झाले असून तपास व मदत कार्य सुरु आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी