शेगावात भारत जोडो यात्रेत महाविकास आघाडीचा मेळा

Sonia Gandhi Rahul Gandhi Sharad Pawar Uddhav Thackeray will attend Bharat Jodo Yatra and Buldhana Shegaon Rally : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून जात आहे. या यात्रेत शेगाव येथे महाविकास आघाडीचे नेते एकत्र दिसतील. या निमित्ताने महाविकास आघाडीच्या नेत्यांचा एकजूट मेळा होणार आहे.

Sonia Gandhi Rahul Gandhi Sharad Pawar Uddhav Thackeray will attend Bharat Jodo Yatra and Buldhana Shegaon Rally
शेगावात भारत जोडो यात्रेत महाविकास आघाडीचा मेळा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • शेगावात भारत जोडो यात्रेत महाविकास आघाडीचा मेळा
  • काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन जर शरद पवार आणि उद्धव ठाकरे येणार
  • महाविकास आघाडी स्थापन होऊन जवळपास तीन वर्ष झाली

Sonia Gandhi Rahul Gandhi Sharad Pawar Uddhav Thackeray will attend Bharat Jodo Yatra and Buldhana Shegaon Rally : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून जात आहे. या यात्रेत शेगाव येथे महाविकास आघाडीचे नेते एकत्र दिसतील. या निमित्ताने महाविकास आघाडीच्या नेत्यांचा एकजूट मेळा होणार आहे. राहुल गांधी यांच्या शेगाव येथील जाहीर सभेला काँग्रेस नेत्या खासदार सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे तीन नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन जर शरद पवार आणि उद्धव ठाकरे शेगावच्या सभेला हजर राहणार आहेत. 

महाविकास आघाडी स्थापन होऊन जवळपास तीन वर्ष झाली आहेत. या निमित्ताने शेगावात महाविकास आघाडीच्या नेत्यांचा एकजूट मेळा होणार आहे. दक्षिण भारतातून महाराष्ट्रात आलेली भारत जोडो यात्रा सध्या विदर्भात आहे. 

भारत जोडो यात्रेंतर्गत शुक्रवार 18 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजता शेगाव येथे एक सभा होणार आहे. या सभेला राहुल गांधी, सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे उपस्थित असतील. शेगावच्या सभेसाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे.

Shraddha Murder case: क्राईम सीरिज पाहून गर्लफ्रेंडचे 35 तुकडे केले, असं काय आहे या अमेरिकन टीव्ही शोमध्ये? 

Murder of partner: 1400 किलोमीटर दूर नेऊन केली लिव्ह-इन पार्टनरची हत्या, नंतरची कृती अधिकच भयंकर

महाविकास आघाडीचा इतिहास

महाविकास आघाडी 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झाली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली. निवडक छोटे पक्ष आणि काही अपक्ष आमदार यांनीही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. महाविकास आघाडीने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार होते. पण एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्या युतीचे सरकार राज्यात कार्यरत झाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी