Sudhir Mungatiwar : वंदे मातरमला विरोध करणार्‍यांचे मत परिवर्तन करू – सांस्कृतिक  मंत्री सुधीर मुनंगटीवार

ज्यांचा वंदे मातरमला विरोध आहे त्यांचे मत परिवर्तन करू अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी दिली आहे. फोन केल्यावर हेलो ऐवजी वंदे मातरम म्हणावे अस निर्णय मुनंगटीवार यांनी घेतला आहे. या निर्णयाला अनेकांनी विरोध केला आहे. त्यावर मुनंगटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

थोडं पण कामाचं
  • ज्यांचा वंदे मातरमला विरोध आहे त्यांचे मत परिवर्तन करू अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी दिली आहे.
  • फोन केल्यावर हेलो ऐवजी वंदे मातरम म्हणावे अस निर्णय मुनंगटीवार यांनी घेतला आहे.
  • या निर्णयाला अनेकांनी विरोध केला आहे. त्यावर मुनंगटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sudhir Mungatiwar : नागपूर : ज्यांचा वंदे मातरमला विरोध आहे त्यांचे मत परिवर्तन करू अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी दिली आहे. फोन केल्यावर हेलो ऐवजी वंदे मातरम म्हणावे अस निर्णय मुनंगटीवार यांनी घेतला आहे. या निर्णयाला अनेकांनी विरोध केला आहे. त्यावर मुनंगटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Sudhir Mungatiwar will change their opinion who oppose vande mataram says cultural minister sudhir mungatiwar)

अधिक वाचा :  Vinayak Mete: विनायक मेटेंसोबत घात की अपघात?, भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले...

नागपुरात मुनंगटीवार म्हणाले की, वंदे मातरम याचा अर्थ या भूमीला वंदन असा होतो. आपल्या देशात लोकशाही आहे आणि या निर्णयाला काही लोकांनी विरोध दर्शवला आहे. त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी २६ जानेवारीपर्यंत आम्ही अभियान राबवू. ज्या लोकांना भारतभूमीला वंदन करण्यासाठी अडचणी निर्माण होतात त्यांना या अभियानाच्या माध्यमातून समजावण्याचा प्रयत्न करू असे मुनंगटीवर म्हणाले.

अधिक वाचा : Santosh Bangar Video : आमदार संतोष बांगर यांनी शिवीगाळ करत लगावली कानशिलात, व्हिडिओ व्हायरल 

तसेच हेलो शब्द हा १८ व्या शकतात आला. या शब्दाचा खरा अर्थ आश्चर्य व्यक्त करणे असा होतो. १८७० मध्ये हा शब्द आला आणि जनमानसांत रुढ झाला. ही इंग्रजांची आपण ठेवली आहे ती आठवण पुसून आपल्या मराठी गीतामध्ये अतिशय सुंदर वर्णन हे वंदे मातरमचे केले आहे. वेद मंत्राहून आम्हा वद्य वंदे मातरम, म्हणजेच देवाच्या मुख्यातून निघणार्‍या वेदांपेक्षाही राष्ट्रभक्त, देशभक्तांच्या ओठातून निघालेले वंदे मातरम हे मला प्राणप्रिय आहे. जे कोणी वंदे मातरमला विरोध करत असून त्यांच्यांशी आम्ही संवाद साधू. वंदे मातरम हा काही राजकीय, जातीय किंवा धर्मांध शब्द नाही. या भावनेने या दृष्टीने आपल्याला याकडे पहायचे आहे. संवादाची सुरूवात वंदे मातरमने व्हावी यात काहीच गैर नाही. संविधानात या गाण्याच्या पहिल्या कडव्याला राष्ट्रगानाचा दर्जा दिला आहे असेही मुनंगटीवार यांनी नमूद केले आहे.

अधिक वाचा : Shinde Govt: दीपक केसरकर नाराज.. हवं होतं आदित्य ठाकरेंचं खातं, पण...

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी