अमरावती : बदली होत नसल्यामुळे एक पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना अमरावती येथे घडली आहे. पोलीस आयुक्तामुळे अमरावतीमधील मध्यवर्ती कारागृहात पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप मृत कर्मचाऱ्याच्या नातेवाईंकांनी केला आहे. आयुक्तावर कारवाई करण्यात यावी अशी, मागणी नातेवाईकांनी केली आहे. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृत देह उचलणार नाही, अशी ठाम भूमिका मृतकाच्या नातेवाईकांनी घेतली आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेले कर्मचारी विजय आडोकार हे अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांनी आज सकाळी अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहाच्या मागे गळफास लावून आत्महत्या केली. पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी बदली केली नसल्याने माझ्या वडिलांनी आत्महत्या केल्याचा आरोप मृत पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीने केला आहे.
पोलीस आयुक्त आणि वलगाव ठाणेदार विजय कुमार वाकसे यांनी वडिलांची बदली अमरावती येथे केली नाही व ठाणेदार वाकसे यांच्या त्रासामुळे वडिलांनी आत्महत्या केल्याचा आरोप मृत पोलीस विजय आडोकार यांच्या मुलींनी केले. वडिलांची तब्येत बरी नसायची आम्ही वारंवार डॉक्टरांचे पत्र सबमिट करूनही माझ्या वडिलांना त्रास दिला जात होत होता, त्यामुळे माझ्या वडिलांनी आत्महत्या केल्याचं मुलींनी म्हटलं आहे.