Supriya sule : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या...

चंद्रपुरात दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चंद्रपुरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली. आमदार जोरगेवार यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीला राज्यातील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे महत्त्व आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व अपक्ष आमदारांची मंगळवारी भेट घेणार आहेत.

थोडं पण कामाचं
  • चंद्रपुरात दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चंद्रपुरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली.
  • आमदार जोरगेवार यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीला राज्यातील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे महत्त्व आहे.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व अपक्ष आमदारांची मंगळवारी भेट घेणार आहेत.

Supriya Sule : चंद्रपूर : चंद्रपुरात दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चंद्रपुरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली. आमदार जोरगेवार यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीला राज्यातील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे महत्त्व आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व अपक्ष आमदारांची मंगळवारी भेट घेणार आहेत. चंद्रपुरात दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चंद्रपुरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली. आमदार जोरगेवार यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीला राज्यातील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे महत्त्व आहे. खासदार सुळे यांचे आमदार जोरगेवार समर्थकांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. आमदार जोरगेवार यांच्या मातोश्री 'अम्मा' यांची  सुळे यांनी भेट घेत चंद्रपूर मतदारसंघात त्यांनी राबविलेल्या विविध कल्पक योजनांची माहिती करून घेतली. 

पुन्हा खासदार व्हायचंय

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मला पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदार संघातुन तिकिट द्यावे अशी विंनती करणार आहे . जोरगेवार यांच्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे यांनी आपण 2024 ची निवडणूक बारामती येथून लढवणार असल्याचे स्पष्ट करत आपण मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले. तसेच आपण कुठल्याही पदासाठी काम करत नाही असेही सुळे म्हणाल्या. आशीष जयस्वाल यांनी मंत्री विकासकामांसाठी टक्केवारी मागतात, असा आरोप केलाय. त्यावर प्रतिक्रिया देताना हे गंभीर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या आईच्या भेटीनंतर सुळे यांनी समाधान व्यक्त केले. कर्तृत्ववान महिलेच्या पोटी आलेल्या कर्तृत्ववान मुलाचे काम पाहताना अभिमान वाटल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. या कौटुंबिक भेटीच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी जोरगेवार यांची नाराजी दूर केल्याचे बोलले जात आहे.अ

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी